अजय देवगणचा आगामी सिनेमा 'तानाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमा चर्चेत आहे.  अजय देवगणची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात अजयची पत्नी काजोल या सिनेमात सावित्रीबाई मालुसरे यांची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील काजोलचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. 


काजोलने स्वत:च्या सोशल मीडियावर आपला लूक शेअर केला आहे. कपाळावर मोठी टिकली आणि नाकात नथ काजोल या फोटोमध्ये मराठमोळ्या अंदाजात दिसतेय. 


तानाजींनी प्राणांची बाजी लावली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या काही सहकाऱ्यांनीदेखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. तानाजी हे शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते.

अजय देवगणला तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे.१५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या तानाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे.

Web Title: Tanhaji the unsung warrior kajol first look from film must see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.