ठळक मुद्देया चित्रपटाने पहिल्याच दिवशी 15.10 कोटी, शनिवारी 20 कोटी, रविवारी 26 कोटी आणि सोमवारी 13 कोटी इतकी कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने 74.1 कोटी कमाई केली असून हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करेल असे म्हटले जात आहे.

अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल स्‍टारर 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' आणि दीपिका पादुकोण स्‍टारर 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यात तान्हाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला बरेच मागे टाकले आहे. हा चित्रपट लवकरच 100 कोटी क्लबमध्ये एंट्री करणार आहे.

दोन्ही सिनेमांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच दोन्ही चित्रपटांच्या टीमने आपापल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. पण तरीही 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाची चांगलीच घौडदौड सुरू आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 15.10 कोटी, शनिवारी 20 कोटी, रविवारी 26 कोटी आणि सोमवारी 13 कोटी इतकी कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने 74.1 कोटी कमाई केली असून हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करेल असे म्हटले जात आहे.

यावरून आगामी दिवसांत 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडणार असेच दिसतंय. दमदार अ‍ॅक्शनचे परिपूर्ण पॅकेज असलेल्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमामुळे पुन्हा अजयची जादू रसिकांवर झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा चित्रपट एकूण 4540 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला होता.

Web Title: Tanhaji: The Unsung Warrior Day 4 Box Office Collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.