tamil film director j mahendran dies | दिग्गज तामिळ दिग्दर्शक जे महेंद्रन यांचे निधन
दिग्गज तामिळ दिग्दर्शक जे महेंद्रन यांचे निधन

ठळक मुद्देजे महेंद्रन यांच्या निधनाने तामिळ सिनेसृष्टीत शोककळा पसरली. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.

भारताच्या दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत सामील तामिळ दिग्दर्शक जे महेंद्रन यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.  जे महेंद्रन  यांनी अनेक गाजलेल्या तामिळ सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन केले.
महेंद्रन काही काळापासून आजारी होते. चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल रात्री त्यांना घरी नेण्यात आले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महेंद्रन यांचे सुपुत्र जॉन महेंद्रन यांनी ट्विटरवरून त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली. जॉन महेंद्रन हेही दिग्दर्शक असून तामिळ सिनेसृष्टीतील एक मोठे नाव आहे.
सन १९३९ मध्ये जे महेंद्रन यांचा जन्म झाला. पटकथा लेखनाने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. पटकथा लेखक म्हणून ‘नाम मोवार’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘मुल्लुम मलरूम’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी चांगलीच दाद दिली. रजनीकांत, जयलक्ष्मी आणि शोभा यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. रजनीकांत यांना सुपरस्टार बनवण्यात ‘मुल्लुम मलरूम’ या चित्रपटाचे मोठे योगदान राहिले.
जे महेंद्रन यांच्या निधनाने तामिळ सिनेसृष्टीत शोककळा पसरली. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.


Web Title: tamil film director j mahendran dies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.