tamil actress jayashree attempts suicide her audio clip viral goodbye message | लोकप्रिय अभिनेत्रीचा झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर
लोकप्रिय अभिनेत्रीचा झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

ठळक मुद्देजयश्री पतीमुळे व्यथित होती. वैवाहिक आयुष्यातील याच कारणांमुळे जयश्रीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

तामिळची सेन्सेशनल अभिनेत्री जयश्रीने झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी जयश्रीने एक  ऑडिओ  क्लिप रेकॉर्ड केली होती. तूर्तास ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय. जयश्रीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिची प्रकृती गंभीर असल्याचे कळतेय.
व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये जयश्री तिच्या मित्रांना ‘गुडबाय’ म्हणताना ऐकू येतेय. संघर्षाच्या काळात मदत केल्याबद्दल तिने सर्वांचे आभारही मानले आहेत.

जयश्री विवाहित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती तिचा पती ईश्वरमुळे चर्चेत होती. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप जयश्रीने अनेक मुलाखतीत केला होता. जयश्रीचे मानाल तर तिच्या पतीचे अभिनेत्री महालक्ष्मीसोबत अफेअर आहे. जयश्रीने पतीवर मुलीसोबत बळजबरी केल्याचा आरोप करत, पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. पतीने आपल्याकडून लाखो रूपये घेतले असून आता तो पैसे परत करण्यास नकार देत असल्याचाही तिचा आरोप आहे. अर्थात ईश्वरने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

जयश्री पतीमुळे व्यथित होती. वैवाहिक आयुष्यातील याच कारणांमुळे जयश्रीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
 आत्महत्या करण्याचं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जयश्रीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तिच्या एका मित्राला फोन केला. त्यानंतर तिच्या मित्राने तिच्या घरी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र सध्या तिची प्रकृती नाजूक असल्याचे कळतेय.

Web Title: tamil actress jayashree attempts suicide her audio clip viral goodbye message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.