Tamil actress gayatri sai file complaint against pizza delivery boy sharing number on adult groups gda | पिझ्झा डिलेव्हरी बॉयने एडल्ट ग्रुपवर शेअर केला अभिनेत्रीचा नंबर, त्यानंतर घडल्या धक्कादायक गोष्टी

पिझ्झा डिलेव्हरी बॉयने एडल्ट ग्रुपवर शेअर केला अभिनेत्रीचा नंबर, त्यानंतर घडल्या धक्कादायक गोष्टी

तमिळ अभिनेत्री गायत्री सईने गेल्या बुधवारी चेन्नई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. गायत्रीने पिझ्झा डिलेव्हरी ब्वॉय विरोधात तक्रार दाखल केली आहे. यात अभिनेत्रीने पिझ्झा डिलेव्हरी ब्वॉयने तिचा नंबर एडल्ट ग्रुपमध्ये शेअर केल्याचा आरोप केला आहे. याची माहिती अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली.  


अभिनेत्री गायत्री सईने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत तिने पिझ्झा डिलेव्हरी ब्वॉयचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. या ट्विटमध्ये गायत्री म्हणते, डॉमिनोज पिझ्झाच्या चेन्नईमधल्या डेलेव्हरी ब्वॉयने नऊ फेब्रुवारीला माझा नंबर एडल्ट ग्रुपमध्ये व्हॉट्सअॅपवर शेअर केला आहे. 


अभिनेत्रीपुढे लिहिले आहे की, ''डेलिव्हरी ब्वॉयच्या ऑफिसमधल्या लोकांनी अजून त्याच्या तक्रार दाखल केलेली नाही कारण आधी त्यांना माझ्याशी बोलायचे होते. माझ्याकडे खूप फोन कॉल्स आणि मॅसेजेस आले आहेत ज्याठिकाणी माझा नंबर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही सगळ्यांना याची काळजी घ्या.'' याशिवाय गायत्रीने व्हॉट्सअॅप मॅसेजेस सुद्धा शेअर केले आहेत. गायत्री सईने प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'अंजली' सिनेमातून बाल कलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. 

Web Title: Tamil actress gayatri sai file complaint against pizza delivery boy sharing number on adult groups gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.