ठळक मुद्देतब्बूने सांगितले होते की, जर एखाद्या मुलाने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ते दोघंही त्याला मारण्याची धमकी द्यायचे. दोघंही खूप मस्तीखोर होते. आजही मी अविवाहित आहे याला फक्त आणि फक्त अजयच जबाबदार आहे.

तब्बूने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तब्बूची गणना होते. तब्बू गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्राचा भाग असली तरी ती कॉन्ट्रोव्हर्सींपासून दूर राहाणेच पसंत करते. ती तिचे खाजगी आणि व्यवसायिक आयुष्य नेहमीच वेगवेगळे ठेवते. तब्बू आज ४८ वर्षांची असली तरी तिने अद्याप लग्न केलेले नाहीये. 

तब्बू आजही अविवाहित आहे, पण याबद्दल ती काहीही बोलणेच नेहमी टाळते. पण ती अविवाहित असण्याला केवळ बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण जबाबदार असल्याचे तिने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. तब्बू आणि अजय देवगण यांची २५ वर्षांपासूनची ओळख आहे. अजय हा तब्बूचा चुलत भाऊ समीर आर्याचा शेजारी होता. त्यामुळे तब्बू आणि अजय यांची अनेक वर्षांपासून खूपच चांगली मैत्री आहे.

तिने या मुलाखतीत सांगितले होते की, अजय आणि समीर हे दोघंही सतत माझ्यावर नजर ठेवून असायचे, जिथे मी जायचे तिथे ते माझा पाठलाग करायचे. या दोघांमुळे इतर मुलांशी बोलण्याचीही भीती वाटायची. जर एखाद्या मुलाने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ते दोघंही त्याला मारण्याची धमकी द्यायचे. दोघंही खूप मस्तीखोर होते. आजही मी अविवाहित आहे याला फक्त आणि फक्त अजयच जबाबदार आहे.

तब्बूचे नाव एकेकाळी साजिद नाडियादवाला आणि नागार्जुन यांच्याशीही जोडले गेले होते. तब्बू साजिद नाडियादवाला याला डेट करत असल्याच्या चर्चा काही वर्षांपूर्वी रंगल्या होत्या. त्यानंतर नागार्जुन आणि तब्बू यांच्या अफेअरच्या चर्चा मीडियात गाजल्या. मात्र नागार्जुन विवाहित होता आणि तो त्याच्या पत्नीला घटस्फोट द्यायला तयार नव्हता. त्यामुळे भविष्याचा विचार करून नागार्जुनपासून वेगळे होण्याचा तब्बूने विचार केला असे म्हटले जाते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tabu is single and Ajay Devgn is responsible for it PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.