Tabu has no dates for 'Bhool Bhulaiya 2', makers are looking for new dates for actresses | तब्बूकडे 'भूल भुलैया 2' साठी नाहीत डेट्स, अभिनेत्रींसाठी मेकर्स शोधतायेत नव्या तारखा

तब्बूकडे 'भूल भुलैया 2' साठी नाहीत डेट्स, अभिनेत्रींसाठी मेकर्स शोधतायेत नव्या तारखा

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे मार्च 2020 मध्ये  अनीस बज्मी यांच्या 'भूल भूलैया २'चे शूटिंग पोस्टपोन करण्यात आला होते. या सिनेमाचे शूट ऑक्टोबर 2020 पासून सुरू होईल अशी अपेक्षा होती पण डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलं. 


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी जानेवारीच्या शेवटच्या दिवसांच्या तारखा कलाकार आणि क्रू मेंबर्सना दिल्या आहेत. मात्र, या सिनेमातील एक महत्त्वाचा भाग असलेला तब्बूला या तारखांना बिझी आहे. इतकेच नाही तर तारखांमुळे तब्बूही या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.


निर्मात्यांना तब्बूला सिनेमात ठेवण्याची इच्छा
 निर्मात्यांना तब्बूला सिनेमात ठेवण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी ते शेड्यूलवर काम करत आहेत. या महिन्याच्या अखेरीस शूट होणार होते आणि त्यानंतर  लखनऊमध्ये शूटिंग होणार होते, आता ते  जुलै 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. लवकरच नव्या तारखा फायनल केल्या जातील. 

 या सिनेमात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. कार्तिक आणि कियारा पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अक्षय कुमार आणि विद्या बालन स्टारर हा हॉरर-कॉमेडी हा 'भूल भुलैया'चा सिक्वल नाही, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tabu has no dates for 'Bhool Bhulaiya 2', makers are looking for new dates for actresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.