‘चांदणी बार’,‘माचिस’असे एक से बढकर एक हिट सिनेमांमध्ये काम करून बॉक्स ऑफिसला  बक्कळ कमाई मिळवून दिलेली अभिनेत्री तब्बू बॉलिवूडची हॉट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. अशातच तिच्या ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातील अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले. आता अजून एक असेच तिने काम केले आहे. तिने एक फोटोशूट करून घेतले आहे. ज्यात तिच्या एकेक अदा अशा आहेत ज्या बघून तुम्ही क्लिन बोल्ड व्हाल यात काही शंकाच नाही.
 


अलीकडेच तब्बूने ‘ आय दिवा’ या डिजिटल मॅगझीनसाठी एक फोटोशूट के ले आहे. या डिजिटल मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसत आहे. ४७ वर्षीय या अभिनेत्रीसाठी वय हा केवळ एक आकडा आहे, असे तुम्ही हे फोटोशूट बघून नक्की म्हणाल. या फोटोशूटमध्ये तब्बू प्रचंड  आकर्षक आणि बोल्ड दिसत आहे. मल्टीकलर सॅटीनच्या ड्रेसमध्ये ती दिसत आहे. या फोटोशूटदरम्यानच्या तिच्या अदा या घायाळ करणाऱ्या  आहेत. 

या फोटोसोबतच अजून एका वेगळया ड्रेसमध्ये ती दिसत आहे. या फोटोत तिने काळया रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये ती भलतीच हॉट दिसतेय. कोणत्याही नव्या दमाच्या अभिनेत्रीला ती मागे टाकेल अशा तिच्या एकेक अदा आहेत. त्यानंतर आर्तिक देव वर्मन यांनी डिझाईन केलेल्या एका ऑफ व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये तिच्या अदा  भूरळ घालत आहेत. या फोटोतील तिचा रॉ लूक चाहत्यांना तिच्यावर खिळवून ठेवायला भाग पाडतोय. 

या फोटोशूटच्या एका फोटोत तिने डीप नेकचा गाऊन परिधान केला आहे. या ड्रेसला प्रसिद्ध डिझायनर प्रशांत वर्मा यांनी डिझाईन केले आहे. यातील तिचे ईयररिंग्ज देखील प्रचंड सुंदर असल्याचे दिसून येत आहे.                                                                 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tabbu's Magazine Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.