tabassum is not suffering from alzheimer clarifies his son hoshang govil | तब्बसुम यांना झाला अल्जाइमर? मुलाने केला खुलासा

तब्बसुम यांना झाला अल्जाइमर? मुलाने केला खुलासा

अभिनेत्री तब्बसुम यांना अल्जाइमर झाला असून त्या कोणालाही ओळखत नाहीत. त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रयत्न करा अशाप्रकारच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पण त्यांना अल्जाइमर झाला नसल्याचा खुलासा त्यांचा मुलगा होशांग गोविलने केला आहे.

होशांग गोविलने एबीपी न्यूजशी संवाद साधताना सांगितले आहे की, माझ्या आईला अल्जाइमर झाला असल्याचे वृत्त संपूर्णपणे चुकीचे आहे. आईला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तिच्यात कोणत्याच प्रकारची लक्षणं नव्हती. तिला कोणता त्रास देखील होत नव्हता. पण वयामुळे आम्ही तिला रुग्णालयात दाखल केले होते. तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिला रुग्णालयातून घरी पाठवण्यात येईल. 

पुढे होशांगने सांगितले की, रुग्णालयात दाखल करण्याच्या दोन दिवसाआधी माझी आई चित्रीकरण करत होती. आईचे ब्लड प्रेशर वाढल्याने आम्ही तिला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. तिला अल्जाइमर झाला आहे अशा बातम्या कोण पसरवत आहे हेच मला कळत नाहीये. 

अभिनेत्री तब्बसुम 77 व्या वर्षी देखील काम करत आहेत. त्या गेल्या 10 वर्षांपासून अभी तो मैं जवान हूँ हा शो टिव्ही एशियासाठी करत आहेत. तसेच त्या त्यांच्या युट्युब वाहिनीवर नेहमीच व्हिडिओ अपलोड करत असतात. फूल खिले हैं गुलशन गुलशन में या शो मुळे तब्बसुम यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: tabassum is not suffering from alzheimer clarifies his son hoshang govil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.