ठळक मुद्देस्वराच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास सध्या ती फराज अन्सारीच्या ‘शीर खुरमा’ या चित्रपटात बिझी आहे.

मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडलात आणि बघता तर काय तुमच्या चपला गायब... असा प्रसंग तुमच्यावरही ओढवला असेल. बॉलिवूडच्या सेलिब्रिटीवर असा एखादा प्रसंग ओढवेल, याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. पण अलीकडे एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत असेच काही घडले. होय, अभिनेत्री स्वरा भास्कर बाप्पाच्या दर्शनासाठी गेली आणि घरी परतताना तिला अनवाणी पायाने चालत यावे लागले. 
सध्या देशभर गणोशोत्सव उत्साहात साजरा होतोय. बॉलिवूड सेलिब्रिटीही बाप्पाच्या दर्शनासाठी आतूर आहेत. स्वरा भास्कर मंगळवारी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचली. लाल रंगाचा सलवार कुर्ता, पायात कोल्हापुरी चप्पल असा तिचा थाट होता. स्वराने मोठ्या भक्तीभावाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. पण बाहेर येऊन बघते तर काय  तिच्या कोल्हापुरी चपला गायब होत्या. मग काय, स्वराला अनवाणी पायाने घरी परतावे लागले.

बाप्पाच्या दर्शनानंतर अनवाणी पायाने घरी परतत असल्याचा व्हिडीओ स्वराने तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. ‘ही आहे खरी भक्ती...अनवाणी पायाने देवाच्या दर्शनाला पोहोचली. तुमच्या चपला हरवणार नसतील तर ते दर्शनच काय?’ असे तिने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले.  


स्वराच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास सध्या ती फराज अन्सारीच्या ‘शीर खुरमा’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शबाना आझमी, दिव्या दत्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Web Title: swara bhasker loses her flats at mumbai lalbaugcha raja return barefoot share post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.