swara bhasker harassed shahrukh khan in aanand l rais party | स्वरा भास्करने नशेत शाहरूखला खूप दिला त्रास; कशी होती किंगखानची रिअ‍ॅक्शन?

स्वरा भास्करने नशेत शाहरूखला खूप दिला त्रास; कशी होती किंगखानची रिअ‍ॅक्शन?

ठळक मुद्देअलीकडे स्वरा ‘फ्लेश’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. मानव तस्करीवर आधारित या वेबसीरिजमध्ये स्वरा पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसली होती.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणजे बॉलिवूडची धाकड गर्ल, परखड बोलणारी, परखड वागणारी अभिनेत्री. सोशल मीडियावरही ती अगदी बेधडक मत व्यक्त करताना दिसते. यावरून अनेकदा ती ट्रोलही होते. पण म्हणून बोलायचे थांबत नाही. याच स्वराने एका ताज्या मुलाखतीत एक मजेदार किस्सा शेअर केला. एका पार्टीत किंगखान शाहरूखला कसा त्रास दिला, कसे छळले, हे तिने सांगितले.

रूद्राणी चॅटर्जीच्या चॅट शोमध्ये तिने हा किस्सा सांगितला. या चॅट शोमध्ये तिला एका पार्टीतील एक फोटो दाखवला गेला. या फोटोत ती शाहरूख खानसोबत होती आणि आनंद एल राय यांच्या घरच्या पार्टीतील हा फोटो होता. हा फोटो पाहून स्वरा हसू लागली. फोटोच्या निमित्ताने तिने अनेक गोष्टी शेअर केल्या.

तिने सांगितले, या पार्टीत मी क्रॉप टॉप घालून गेले होते. कारण त्यावेळी मी खूप सडपातळ होते. पार्टीत जरा जास्त प्यायले होते आणि शाहरूखला मी चांगलाच त्रास दिला होता. अगदी मन भरून त्याला सतावले होते. मात्र शाहरूखने अगदी संयमाने मला सहन केले होते. मी त्याला भंडावून सोडले. पण तो जराही वैतागला नाही.
अलीकडे स्वरा ‘फ्लेश’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. मानव तस्करीवर आधारित या वेबसीरिजमध्ये स्वरा पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसली होती. चित्रपटांबद्दल बोलात तर ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमात ती अखेरची दिसली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: swara bhasker harassed shahrukh khan in aanand l rais party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.