ठळक मुद्दे‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटाच्या सेटवर हिमांशू व स्वरा या दोघांची ओळख झाली.

 प्रत्येक मुद्यावर परखडपणे बोलणारी आणि यामुळे सतत ट्रोल होणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर मध्यंतरी तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. होय, हिमांशू शर्मासोबत तिचे नाव जोडले गेले होते. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले. आत्तापर्यंत स्वरा यावर कधीही बोलली नाही. पण आता वर्षभरानंतर तिने या ब्रेकअपबद्दल खुलासा केला आहे.
होय, पिंकविला या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत स्वरा पहिल्यांदा ब्रेकअपबद्दल बोलली. मी व हिमांशू शर्मा आम्हा दोघांचे मार्ग आता वेगवेगळे आहेत, असे स्वराने सांगितले. आम्ही विभक्त होण्याचे हेच कारण होते, असेही ती म्हणाली.  

तिने सांगितले, आयुष्यात अनेकदा अशी वळणे येतात, जेव्हा तुम्ही आणि तुमचा पार्टनर दोन वेगवेगळ्या दिशांना जाऊ इच्छितात. एकाला एका मार्गाने जायचे असते तर दुस-याला दुस-या मार्गाने. अशात तडजोड करून दोघांपैकी एकानेही मार्ग बदललाच तर नाते टिकू शकते. पण दोघेही मार्ग बदलायला तयार नसतील तर नाते तिथेच संपते. आमच्यापैकी दोघांनीही एकमेकांना फसवले नाही. पण आमचा प्रवास कदाचित इथपर्यंतच होता. आता आम्ही दोघेही आपआपल्या मार्गावर बरेच पुढे गेलो आहोत.

हिमांशू शर्मा हे इंडस्ट्रीत लेखक म्हणून काम करतात. त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे. रांझणा, तनु वेड्स मनु, खोसला का घोसला, शुभमंगल सावधान आणि झिरो या चित्रपटांसाठी त्याने काम केले आहे.

‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटाच्या सेटवर हिमांशू व स्वरा या दोघांची ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेम फूलले होते. यानंतर सुमारे 5 वर्षे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली. अर्थात ब्रेकअप झाल्यावर अजूनही ते दोघे एकमेकांसोबत टचमध्ये असल्याचे कळतेय.
स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तिचा ‘शीर कोरमा’ हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: swara bhaskar speak up over breakup with himanshu sharma-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.