Swara Bhaskar gets trolled for abusing a 4 year old kid | बापरे...! स्वरा भास्करने ४ वर्षाच्या लहान मुलाला केली शिवीगाळ, व्हिडिओ होतोय व्हायरल
बापरे...! स्वरा भास्करने ४ वर्षाच्या लहान मुलाला केली शिवीगाळ, व्हिडिओ होतोय व्हायरल


बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी तिच्या भूमिकेमुळे चर्चेत येते तर कधी राजकीय विचारांमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी स्वरा भास्करने ४ वर्षाच्या लहान मुलाला शिवीगाळ केल्यामुळे लोकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.


या व्हिडिओत स्वरा एका ४ वर्षाच्या लहान मुलाला शिवी देत वाईट शब्द वापरताना दिसते आहे. याशिवाय तिने त्या मुलाला कमीना असं देखील म्हटलं.

या व्हिडिओत स्वरा बोलतेय की, एका जाहिरातीच्या शूटिंगनंतर मला चांगलं वाटत नव्हते. त्यावेळी माझं करियरदेखील सुरू झालं नव्हतं आणि एका बालकलाकाराने मला आंटी असं संबोधलं होतं. त्यानंतर स्वरानं त्या मुलाला शिवीगाळ केली होती. यादरम्यान तिथे उपस्थित असलेले लोक स्वराच्या या बोलण्यावर हसत होते. मात्र स्वराचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले आहेत. 
इतकंच नाही तर यासंदर्भात स्वराच्या विरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. एक सामाजिक संस्था लीगल राइट्स प्रोटेक्शन फोरमने नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राइट्स अंतर्गत तक्रार दाखल केली असून तिच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Swara Bhaskar gets trolled for abusing a 4 year old kid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.