swara bhaskar gave reaction on sushant singh rajput name dragged in drug case | खुश? की आणखी काही बाकी...! सुशांतबद्दलच्या सारा-श्रद्धाच्या खुलाशानंतर संतापली स्वरा भास्कर

खुश? की आणखी काही बाकी...! सुशांतबद्दलच्या सारा-श्रद्धाच्या खुलाशानंतर संतापली स्वरा भास्कर

ठळक मुद्देएनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सारा व श्रद्धाने काही धक्कादायक खुलासे केलेत.

सुशांत सिंग राजपूतने गेल्या 14 जूनला जगाला अलविदा म्हटले. सुशांतच्या मृत्यूला 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला पण अद्यापही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. सुशांत प्रकरणाचा तपास करता करता एनसीबी बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनपर्यंत पोहोचली आणि सुशांत प्रकरणावरून सगळा फोकस बॉलिवूडच्या या ड्रग्ज प्रकरणावर केंद्रीत झाला. ड्रग्ज प्रकरणी दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह या बड्या अभिनेत्रींची नावे समोर आल्यानंतर तर खळबळ माजली. या अभिनेत्रींच्या एनसीबी चौकशीत पुन्हा एकदा सुशांतचे नाव समोर आले. सुशांत व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्ज घ्यायचा, असा खुलासा सारा व श्रद्धाने चौकशीत केला. या पार्श्वभूमीवर आता अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे. स्वराने एक न्यूज आर्टिकल शेअर करत, काहीशा नाराजीच्या सूरात ट्विट केले.


‘खुश? जस्टिस फॉर सुशांत सिंग राजपूत बिग्रेड. बस या अभी और भद्द पिटवानी है बेचारे सुशांत की??,’असा सवाल तिने या ट्विटमध्ये केला आहे.
सुशांतच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘जस्टिस फॉर सुशांत सिंग राजपूत’ची मोहिम सुरु केली होती. याद्वारे चाहत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अखेर सुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले. शिवाय या प्रकरणात ईडी आणि पाठोपाठ एनसीबीचीही एन्ट्री झाली. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबी अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये आली. याप्रकरणी आधी रिया चक्रवर्तीला अटक झाली आणि यानंतर दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग अशा मोठ्या नट्याही एनसीबीच्या रडारवर आल्यात.

"शूटिंगस्थळी अनेकदा सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते", श्रद्धा आणि साराचा मोठा खुलासा

सुशांतला ड्रग्ज घेताना पाहिले होते...


 
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सारा व श्रद्धाने काही धक्कादायक खुलासे केलेत. केदारनाथ या सिनेमादरम्यान सुशांतला अनेकदा व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्ज घेतल्याचे पाहिले असल्याचा दावा साराने केल्याचे कळते. चौकशीत साराने आपण स्वत: ड्रग्ज घेत नाही, असे स्पष्ट केले. पण सुशांतबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.  केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी सुशांतबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. एवढंच नाही तर या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर सुशांतच्या केप्री हाऊस इथल्या घरात त्याच्याबरोबर राहायलाही सारा गेले होते, असे तिने सांगितले.

एनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू!!

श्रद्धा कपूरनेही दिली कबुली
श्रद्धा कपूरने एनसीबीसमोर असे मान्य केले आहे की तिने सुशांतला कधी व्हॅनिटीमध्ये तर कधी सेटवर देखील ड्रग्ज घेताना पाहिले आहे. छिछोरे सिनेमाच्या सक्सेस पार्टीत मी गेले होते. तिथे काही लोकांनी ड्रग्ज घेतली. पण मी घेतली नाही, असे श्रद्धाने यावेळी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू!!
ड्रग्जप्रकरणी दीपिका पादुकोण काल शनिवारी एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर झाली. सुमारे पाच तास तिची चौकशी झाली. यावेळी दीपिकाला एनसीबीच्या अनेक कठोर व कठीण प्रश्नांचा सामना करावा लागला. या प्रश्नांचा भडीमार सहन करत असताना दीपिकाला एकदा नाही तर तिनदा रडू कोसळले.
इंडिया टुडेने एनसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका शनिवारी सकाळी 10 वाजता एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली.यानंतर लगेच तिच्या चौकशीला सुरुवात झाली. यादरम्यान, ड्रग्जसंदर्भात आपण चॅट केले होते, असे तिने कबुल केले. मात्र  स्वत: ड्रग्ज घेत असल्याचा इन्कार केला़ चौकशीत एकापाठोपाठ एक प्रश्न विचारले जात असताना दीपिकाला अचानक रडू कोसळले. असे एकदा नाही तर तीनदा झाले़ तिच्या डोळ्यांत अश्रू आलेत.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: swara bhaskar gave reaction on sushant singh rajput name dragged in drug case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.