बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असते. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार लेखक हिमांशु शर्मासोबत ब्रेकअप झाल्यानंतर स्वराच्या लाईफ एका नव्या व्यक्तिची एंट्री झाली आहे. स्वरा सध्या दिवंगत अभिनेते गिरिश कर्नाड यांचा मुलगा रघू कर्नाडला डेट करतेय. दोघे एकत्र क्वॉलिटी टाईम स्पेंट करत आहेत. दोघे नुकतेच    Yomeddineच्या स्पेशल स्क्रिनिंग एकत्र स्पॉट झाले. स्क्रिनिंगनंतर स्वरा आणि रघू डिनरला सुद्धा गेले. 


रघू कर्नाड हे व्यवसायने एक पत्रकार आणि लेखक आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वरा आणि रघूचे बॉन्डिग दिवसंदिवस घट्ट होत चालले आहे. स्वरा किंवा रघूने अधिकृतपणे ही गोष्ट अजून स्वीकारलेली नाही.   


रिपोर्टनुसार गेल्या ५ वर्षांपासून स्वरा भास्कर आणि तिचा बॉयफ्रेंड हिमांशु शर्मा हे नात्यांत होते. स्वरा हिमांशुकडे  वारंवार ‘आपण लग्न करूयात’ या मुद्यावरून बोलत असे. पण, हिमांशुच्या डोक्यात स्वरासोबत लग्न करण्याचा विषयच नव्हता.

त्यामुळेच स्वराने या नात्याला पूर्णविराम देण्याचे ठरवले. मग त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता स्वराच्या आयुष्यात राघूची एंट्री झाली आहे. स्वरा नेहमीच महिलाकेंद्रित मुद्दे असोत किंवा देशाच्या बाबतीत काही मुद्दे यांच्या माध्यमातून ट्विट  करून स्वरा भास्कर कायम चर्चेत असल्याचे आपण पाहिले आहे. 

Web Title: Swara bhaskar is dating journalist raghu karnad after the breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.