ठळक मुद्देलॉकडाऊनपासून सुजैन हृतिकच्या घरी राहतेय. मुलांसाठी तिने हा निर्णय घेतला होता.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला धडकी भरवली आहे. या व्हायरसचे थैमान रोखण्यासाठी सरकार लॉकडाऊन व सोशल डिस्टेंसिंगसारखे नियम लागू केलेत. तीन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर हळूहळू सगळे काही अनलॉक होताना दिसतेय. अर्थात तरीही कोरोनाची धास्ती कायम आहे. यासाठी सतर्कता गरजेची आहे. हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान हिने किती सतर्कता बाळगावी तर अख्खे सलून खाली करण्याइतकी.
होय, सुजैन 4 महिन्यानंतर सलूनमध्ये पोहोचली. सतर्कतेपोटी तिच्यासाठी अख्खे सलून खाली करण्यात आले.  सुजैन  बुधवारी हेअर कट व हेअर स्पा घेण्यासाठी सलूनमध्ये पोहोचली. पण त्याआधी तिने अख्खे सलून खाली करवले. होय, म्हणजे, तिने एकटीसाठी अख्खे सलून बुक केले.

सुजैनने सलूनमधला फोटो शेअर करत स्वत: ही माहिती दिली. ‘4 महिन्यानंतर अखेर हेअर कट व ट्रिटमेंट स्पाचा दिवस आला. त्यांनी संपूर्ण सलून माझ्यासाठी खाली केले. पाहून आनंद झाला. या फन टाइमसाठी खूप खूप आभार, ’ असे सुजैनने हा फोटो शेअर करताना लिहिले.

सुजैन सलूनमधून बाहेर पडल्यावर मीडियाचे कॅमेरे तिच्यावर रोखले गेलेत. यावेळी तिच्या चेह-यावर मास्क आणि शील्ड होते. मीडियाच्या फोटोग्राफर्सलाही दूर राहा, असे सांगताना ती दिसली.

सुजैन व हृतिकचा घटस्फोट झालाय. पण लॉकडाऊनपासून सुजैन हृतिकच्या घरी राहतेय. मुलांसाठी तिने हा निर्णय घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात माझ्या दोन्ही मुलांना आई व बाबा दोघांची गरज आहे. अशावेळी मी त्यांना एकटे सोडू शकत नाही. लॉकडाऊन आहे तोपर्यंत मी माझ्या मुलांसोबतच राहणार असे सुजैनने म्हटले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sussane khan step out for a salon session today wears face shield along mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.