बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची एक्स पत्नी आणि इंटिरियर डिझायनर सुजैन खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिच्या नेहमीच्या आयुष्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच तिने इंटीरियर डिझायनिंग प्रोजेक्टची काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यावर त्याचा कथित बॉयफ्रेंड अर्सलन गोनीने कमेंट केली आहे.

सुजैन खानने शेअर केलेल्या फोटोत तिच्या मित्रांनी कमेंट करत तिला प्रोत्साहान दिलं आहे. त्याचसोबत अर्सलन गोनीने देखील कमेंट केली आहे. 'ब्रिलेन्स' अशी कमेंट अर्सलनने केली आहे.  निर्माता एकतर कपूरनेही फायरवाला इमोजी पोस्ट केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सुजैन ‘बिग बॉस 14’ चा स्पर्धक अली गोनीचा चुलत भाऊ व अभिनेता अर्सलन गोनीला डेट करत असल्याची बातमी आहे. दोघे अनेकदा टीव्ही इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणीसोबत हँग आउट करताना दिसतात. यावर सुजैन आणि अर्सलन अलीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अशी झाली होती सुजैन आणि अर्सलन भेट
काही दिवसांपूर्वी पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून अर्सनल व सुजैन एकमेकांच्या संपर्कात असल्याचे आणि काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.काही कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून सुजैन-अर्सनल यांची भेट झाली होती. हे दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. देहबोलीवरून या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा वेगळे नाते असल्याचे स्पष्टपणे दिसते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sussane khan rumoured boyfriend arslan goni comment on interior designer new post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.