ठळक मुद्देराजीवने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये चारूने वांगी कलरचा नाईट ड्रेस घातला आहे तर राजीव शर्टलेस आहे. या फोटोत राजीव चारुला किस करताना दिसत आहे. या दोघांचे हे खाजगी फोटो नेटिझन्सना आवडलेले नाहीयेत.

सध्या लॉकडाऊन असल्याने सगळेच आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. अनेकजण सोशल मीडियावर आपल्या परिवारासोबतचे फोटो देखील शेअर करत आहेत. पण सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने पत्नी चारू आसोपासोबत टाकलेल्या काही खाजगी फोटोंमुळे त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. 

राजीवने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये चारूने वांगी कलरचा नाईट ड्रेस घातला आहे तर राजीव शर्टलेस आहे. या फोटोत राजीव चारुला किस करताना दिसत आहे. या दोघांचे हे खाजगी फोटो नेटिझन्सना आवडलेले नाहीयेत. या फोटोमुळे त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. या फोटोसोबत राजीवने कॅप्शन लिहिले आहे की, सध्या मी तिच्या प्रेमात क्वॉरंटाईन झालो आहे आणि तुम्ही?

राजीव आणि चारुचे हे फोटो पाहून नेटिझन्स चांगलेच भडकले आहेत. इतके खाजगी फोटो तुम्ही कसे काय पोस्ट करू शकता असे काहीजण त्यांना विचारत आहेत तर राजीवला लोकांना काय दाखवायचे आहे असा देखील प्रश्न नेटिझन्सना पडला आहे. हे फोटो तुमच्या घरातल्यांनी पाहिले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल असे देखील त्यांना नेटिझन्स विचारत आहेत.

राजीवला सोशल मीडियावर ट्रोल केली जाण्याची ही पहिली वेळ नाहीये. त्याने काही महिन्यांपूर्वी चारु आणि त्याचे कारमधील रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. त्यावेळी देखील नेटिझन्सने त्यांना चांगलेच सुनावले होते. 

राजीव व चारू यांचे गेल्या वर्षी गोव्यात काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न पार पडले. राजस्थानी व बंगाली पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे फोटोदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. सुश्मिता सेनच्या कुटुंबाने नववधू चारुचा बंगाली पद्धतीनं गृहप्रवेश केला होता. चारू व राजीवने गोव्यात लग्न करण्याआधीच गुप्तपणे लग्न करून सगळ्यांना चकित केले होते. त्यानंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

Web Title: Sushmita Sen's brother Rajeev Sen, his wife Charu Asopa get trolled for 'private' photos PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.