Sushmita sen reveal she was diagnosed addison disease and fought determination | तब्बल चार वर्षे मृत्यूशी झुंज देत होती सुश्मिता सेन, तिनेच सांगितला हा धक्कादायक अनुभव

तब्बल चार वर्षे मृत्यूशी झुंज देत होती सुश्मिता सेन, तिनेच सांगितला हा धक्कादायक अनुभव

सुश्मिता सेन दीर्घकाळापासून चित्रपटांमधून गायब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लम’ नंतर ती सिनेमात दिसलीच नाही. पण चर्चेत राहणे मात्र ती विसरत आहे. बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबतच्या रिलेशनशीपमुळे ती चर्चेत असते.  

सुश्मिता सेनने एका इंटरव्हु दरम्यान सांगितले की, ‘सप्टेंबर 2014 साली एका बंगाली चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर मी खूप आजारी पडली होती. एके दिवशी मी अचानक बेशुद्ध पडले. यानंतर मला रूग्णालयात हलवण्यात आले़ यादरम्यान मला ऑटो इन्यूनसंबधित आजार असल्याचे निदान झाले. या आजाराचे नाव होते एडिसन. या आजाराने माझ्यातील शक्ती संपत चालली होती. एक थकलेले, खंगलेले शरीर आणि खूप सारी निराशा होती. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे तयार झाली होती. ते दिवस मी कधीही विसरू शकत नाही. या आजाराला हरवण्यासाठी मी चार वर्षे लढले. मी माझ्या मेंदूला आणि शरीराला यासाठी तयार केले. नान चकवर लक्ष केंद्रीत केले. या आजाराशी लढले आणि नंतर वेदना माझ्यासाठी कला ठरली, 2019 पर्यंत मी ठीक झाले़ यातून पूर्णत: बाहेर पडले.’

रोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushmita sen reveal she was diagnosed addison disease and fought determination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.