ठळक मुद्दे अविवाहित सुष्मिताला दोन मुली आहेत. तिने   रिनी आणि अलिया अशा दोन मुली दत्तक घेतल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिचा आज वाढदिवस. सध्या सुश्मिता तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान रोहमन शॉल या तरूणाला डेट करतेय. रोहमनआधी सुश्मिताच्या आयुष्यात अनेक पुरूष आलेत. एक नव्हे तर अनेकजण. पण यापैकी एकाही पुरूषासोबतचे तिचे नाते पुर्णत्वास जाऊ शकले नाही. आज चाळीशी ओलांडल्यानंतरही सुश्मिता अविवाहित आहे, ते याचमुळे.


 अविवाहित सुष्मिताला दोन मुली आहेत. तिने   रिनी आणि अलिया अशा दोन मुली दत्तक घेतल्या आहेत.
आज सुश्मिताच्या चर्चित अफेअरबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.   


 
करिअरच्या सुरुवातीला दिग्दर्शक विक्रम भटसोबत सुश्मिताचे नाव जुळले. पण हे नाते फार काळ टिकले नाही. या ब्रेकअपनंतर विक्रम भट अनेक वर्षे डिप्रेशनमध्ये गेले होते. पण सुश्मिताने मात्र लगेच मुव्ह आॅन केले.


 विक्रम भट्टसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुश्मिताच्या आयुष्यात हॉटेल व्यवसायिक संजय नारंगची एन्ट्री झाली. अगदी दोघांनी साखरपुडा केल्याच्या बातम्याही त्यावेळी चर्चेत होते. पण त्या अफवा निघाल्या. या नात्याची परिणीतीही ब्रेकअपमध्ये झाली.  

यानंतर हॉटेलमालक सबीर भाटीयासोबत तिचे नाव जुळले. सबीरने सुश्मिताला एक डायमंड रिंगसुध्दा भेट दिली असल्याची अफवा होती. मात्र सबीरने याला मैत्रीचे नाव दिले होते.

विक्रम भट व सुश्मिताच्या रिलेशनशिपनंतर सर्वाधिक चर्चा झाली तर अभिनेता रणदीप हुड्डा व सुश्मिताच्या अफेअरची. हे अफेअर प्रचंड गाजले. रणदीप बॉलिवूडमध्ये नवखा असताना तो सुश्मिताच्या पे्रमात अडकला. पण हे नातेही काहीच वर्षांत संपुष्टात आले.

 एकेकाळी सुष्मिताचे नाव बिझनेसमॅन इम्तियाज खत्रीसोबत जुळले होते. अर्थात सुश्मिता व इम्तियाज या दोघांनीही या नात्याला नाकारले होते.

निर्माता मानव मेनन व सुश्मिताच्या अफेअरच्या चर्चाही एकेकाळी चर्चेत होत्या. एका अ‍ॅड फिल्मच्या निमित्ताने दोघांची भेट झाली होती.


एका टॅलेंट कंपनाचा मालक बंटी सचदेवासोबतही सुश्मिताचे अफेअर असल्याच्या बातम्या होत्या.  परंतु काही दिवसांतच दोघांचे ब्रेकअप झाले.  

 दिग्दर्शक मुदस्सर अजीजसोबतसुध्दा सुश्मिताच्या अफेअरच्या चर्चा खूप रंगल्या. मुदस्सर नेहमी सुश्मिताच्या अपार्टमेंटवर जाताना दिसायचा. सुश्मिताची मुलगी रिनीसोबत त्याचे चांगले पटत होते. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले.

 पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरमसोबत तिचे नाव जुळले होते. दोघांची भेट एका टीव्ही रिअ‍ॅलिटी शो दरम्यान झाली होती. दोघे लग्न करणार, अशी चर्चा होती. परंतु दोघांनी याला नकार दिला होता.

 अनिल अंबानी व सुश्मिताच्या अफेअरच्या चर्चाही एकेकाळी चर्चेत होत्या.   रिनी दुसरी कुणाची मुलगी नसून अनिल अंबानी यांची मुलगी आहे, अशीही अफवा त्याकाळी होती.

अनेक नाईट क्लबचा मालक असलेला  रितिक भसीनसोबतही तिचे नाव जुळले होते. दोघांनी 2 वर्षे डेटींग केले, परंतु 2015 मध्ये सुश्मिताने रितिकसोबतसुध्दा ब्रेकअप केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushmita sen dated 11 boyfriend know about them on her birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.