बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा जवळचा मित्र संदीप सिंग सध्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. सोशल मीडियावर सुशांतच्या निधनाशी निगडीत बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. यादरम्यान संदीप सिंग व अंकिता लोखंडेचे काही फोटो पाहिल्यानंतर सुशांतचे चाहते संदीप सिंगवर वैतागले आहेत आणि त्याला चांगलेच खडेबोल सुनावत आहेत. खरेतर हे फोटो पीएम नरेंद्र मोदी बायोपिकच्या प्रीमियर दरम्यानचे आहेत.


अंकिता लोखंडे आपल्या फ्रेंडचा सिनेमा पीएम नरेंद्र मोदीला सपोर्ट करण्यासाठी गेली होती. या प्रीमियर वेळचे संदीप व अंकिता यांचे फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांचा संताप अनावर झाला आहे.


संदीप सिंगवर चाहते गंभीर आरोप करत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की सुशांतच्या निधनामध्ये संदीपचा हात आहे. सुशांतचे चाहते सध्या खूप रागात असून सगळ्यांकडे संशयाने पाहत आहेत.


पीएम नरेंद्र मोदी बायोपिकच्या स्क्रिनिंगवेळी अंकिता बॉयफ्रेंड विकी जैनसोबत गेली होती. मागील वर्षी रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी विकी जैन व अंकिता लोखंडेने खूप फोटो काढले होते.सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर बऱ्याच चर्चांना उधाण आले. काही लोकांचे म्हणणे आहे संदीप सुशांतच्या निधनानंतर लाइमलाइटमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे.

सुशांतच्या निधनाच्या वृत्तामुळे अंकिता लोखंडे कोलमडून गेली आहे. जेव्हा अंकिता सुशांतच्या घरातल्यांना भेटण्यासाठी वांद्रे येथील फ्लॅटवर गेली होती तेव्हा तिचे पाय थरथरत होती आणि खूप रडत होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant's fans are furious when they see the photos of Ankita Lokhande and Sandeep Singh, saying- 'This is the reason why Sushant ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.