Sushant suicide case takes a different turn, suspicion on that green cloth | सुशांत आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, त्या हिरव्या कपड्यावर संशय

सुशांत आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, त्या हिरव्या कपड्यावर संशय

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आता या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. आता त्या हिरव्या कपड्याच्या क्षमतेची तपासणी होणार आहे. खरंच सुशांतने त्या कपड्याचा वापर करून आत्महच्या केली का याबाबत तपास केला जाणार आहे. यामध्ये त्या कपड्याची क्षमता सुशांतचे वजन पेलावणारी होती का, याबाबत तपास केला जाणार आहे.

सुशांत सिंग राजपूतने 14 जूनला वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यादिवशी जेव्हा पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याचा मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. मृतदेह लटकताना पोलिसांनी पाहिले नाही. सुशांतच्या घरामध्ये जे व्यक्ती उपस्थित होते, त्यांनी असा जबाब दिला होता की सुशांतने आत्महत्या केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतने पंख्याला लटकून फाशी घेण्यासाठी हिरव्या रंगाच्या नाईट गाऊनचा वापर केला होता.


एका तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या गाऊनचे फॉरेन्सिक विश्लेषण करण्यासाठी सायन्स लॅबमध्ये पाठवले आहे आणि अंतिम अहवाल येण्यासाठी आणखी 3-4 दिवस जातील.


दरम्यान सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या हस्तींची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियो की रामलीला’ या चित्रपटातून सुशांतला रिप्लेस करत त्याच्या जागी रणवीर सिंगला मुख्य भूमिका देण्यात आली होती. त्यानुसार या चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांची पोलीस चौकशी करणार असल्याचे समजते. तसेच बॉलिवूडमधील घराणेशाहीबाबत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ व्हिडीओ पोस्ट करत निशाणा साधणारी अभिनेत्री कंगना रनौतचाही याप्रकरणी जबाब नोंदविला जाणार असल्याचीही माहिती आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant suicide case takes a different turn, suspicion on that green cloth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.