काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये अशा आहेत ज्या आपल्या करियरपेक्षा कॉन्ट्रव्हर्सीमुळे चर्चेत आल्या होत्या. या अभिनेत्रींमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. सध्या रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूतसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे. रियाचे महेश भट यांच्यासोबतचे फोटो देखील खूप चर्चेत आले होते.

खरेतर सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती जास्त चर्चेत आली. सुशांत आत्महत्येप्रकरणी पोलीस तिची चौकशी करत आहे. रिया सुशांतच्या जास्त जवळच्या व्यक्तींपैकी होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिया व सुशांत यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न करणार होते. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


यादरम्यान रिया चक्रवर्तीचे दिग्दर्शक महेश भट यांच्यासोबतचे फोटो समोर आले. जे लोकांना पटले नाहीत. या फोटोत महेश भट रियाला मिठीत घेताना दिसले.


सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर चाहते या प्रकरणाचा तपास सीबीआयने लावावा, अशी मागणी करत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सुशांतच्या घरांतल्यासोबत त्याच्या जवळच्या व्यक्तींचीदेखील चौकशी केली.रिया चक्रवर्ती तिचा सिनेमा जलेबी सिनेमाच्या रिलीजवेळी सुद्धा खूप चर्चेत राहिली होती. कारण होते या सिनेमाचे पोस्टर. ज्यावर रिया ट्रेनच्या खिडकीतून तिच्या सहअभिनेत्याला किस करताना दिसली होती. ज्यावर मीम्स सुद्धा व्हायरल झाले होते.रियाने 2013 मध्ये 'मेरे डॅड की मारूती' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात ती साकिब सलीमसोबत दिसली होती. तसेच राम कपूर यांचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका होती.रियाने 7 वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दीत तिने काही चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले आहे. ज्यात 'दोबारा' 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमांचा समावेश आहे. लवकरच ती अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत 'चेहरे' या सिनेमात दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant Singh Rajput's girlfriend Riya Chakraborty has been in the spotlight due to more controversy than movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.