ठळक मुद्देएफआयआर दाखल झाल्यानंतर रियाने एक व्हिडीओ जारी करत तिची बाजू मांडली होती.

सुशांत सिंग आत्महत्याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या अडचणी वाढल्या आहेत. सुशांतच्या वडिलांनी रिया व तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल करत तिच्यावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा, ब्लॅकमेल केल्याचा आणि पैसे हडपल्याचा आरोप केला आहे. रियाने सुशांतला त्याच्या कुटुंबापासून तोडले होते, असाही आरोप रियावर होत आहे. आता सुशांतची मैत्रिण क्रिस्सन बॅरेटो हिनेही रियावर आरोप केला आहे.

एफआयआर दाखल झाल्यानंतर रियाने एक व्हिडीओ जारी करत तिची बाजू मांडली होती.‘ माझा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्याय नक्कीच मिळेल. इलेक्ट्रॉनिक मीडियात माझ्याबद्दल अनेक विचित्र गोष्टी बोलल्या जात आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. सत्याचा विजय होईल. सत्यमेव जयते,’ असे रियाने या व्हिडीओत म्हटले होते. तिच्या या व्हिडीओवर क्रिस्सन बॅरेटो हिने प्रतिक्रिया दिली आहे.

क्रिस्सन बॅरेटोने तिच्या पोस्टमध्ये लिहिलेय, ‘सुशांतने जेव्हापासून या महिलेला डेट करणे सुरु केले, तेव्हापासून तो आमच्यापासून दुरावला. सुशांतचे सगळे नंबर बदलले गेलेत आणि आम्हाला हे ठाऊक आहे. आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही केला पण आम्ही पोहोचू शकलो नाही. रिया चक्रवर्तीचे सत्य जगासमोर येईल आणि आम्ही याचा पाठपुरावा करू. सत्यमेव जयते, तुझ्यासाठीही....’

क्रिस्सन बॅरेटोने आणखी एक पोस्ट केली. त्यात तिने लिहिले, ‘मी इथे जे काही सांगितले, त्यानंतर हे लोक माझ्यासोबतही काही वाईट करण्याचा प्रयत्न करू शकतात. ती (रिया) ब्लॅक मॅजिक वगैरे करते ऐकले. मी स्वत:ला कधीच मारणार नाही. हे माझे आॅफिशिअल स्टेटमेंट आहे. होऊ शकते, ज्याप्रकारे या लोकांनी सुशांतला मारले, तसेच मराही मारतील.’

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajputs friend krissann barretto comments how his numbers changed after dating rhea chakraborty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.