sushant singh rajputs ex-driver revealed why actor could not commit suicide | सुशांतचा ड्राईव्हर म्हणाला, सर आत्महत्या करूच शकत नाहीत; सांगितला ‘तो’ किस्सा

सुशांतचा ड्राईव्हर म्हणाला, सर आत्महत्या करूच शकत नाहीत; सांगितला ‘तो’ किस्सा

ठळक मुद्देसुशांतच्या आत्महत्येबद्दल विचारल्यावर अनिल म्हणाला, ‘चंद्राची स्वप्नं पाहणारा माणूस आत्महत्या करतो, यावर माझा तरी विश्वास नाही.

सुशांत सिंग रातपूतचा मृत्यूचे रहस्य दिवसेंदिवस आणखी गडद होत असताना आता सुशांतचा ड्राईव्हर अनिल याने काही धक्कादायक खुलासे केले आहे. सुशांतसारखा माणूस आत्महत्या करू शकतो यावर आपला विश्वासच बसत नसल्याचे अनिलने म्हटले आहे. रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनिलने अनेक खुलासे केलेत. 2018 मध्ये अनिलने सुशांतसाठी अडीच महिने काम केले होते.

काय म्हणाला सुशांतचा ड्रायव्हर अनिल
अनिल म्हणाला, ‘मी सुशांत सरांसोबत रोज 15-16 तास घालवायचो. त्यांना शूटवर घेऊन जाण्यापासून तर त्यांना हवे नको ते बघण्यापर्यंत सगळी कामे करायचो. मात्र अचानक मला नोकरीवरून काढण्यात आले. माझ्या कामावर कदाचित ते खूश नसतील. पण मी एकटा नाही तर माझ्यासोबत 2 ड्रायव्हर्स आणि एका बॉडीगार्डलाही नोकरीवरून कमी करण्यात आले. आम्हाला अचानक नोकरीवरून काढले गेले. तारीख आठवत नाही. पण ‘केदारनाथ’च्या रिलीजनंतर ते ‘छिछोरे’चे शूटींग करत असताना हे घडले.’

मृत्यूला घाबरायचा सुशांत...
सुशांतच्या आत्महत्येबद्दल विचारल्यावर अनिल म्हणाला, ‘चंद्राची स्वप्नं पाहणारा माणूस आत्महत्या करतो, यावर माझा तरी विश्वास नाही. एकदा त्यांना बराच उशीर झाला होता. मी त्यांची वाट पाहत होतो. अचानक माझा डोळा लागला आणि मी कारमध्ये झोपलो. सर, आलेत तेव्हा तू झोपला होतास का? असे त्यांनी मला विचारले. मी नाही म्हणालो. यावर तू गाडी चालवू नकोस, असे म्हणून त्यांनी गाडी स्वत: चालवली होती. ज्या व्यक्तिला मृत्यूची इतकी भीती वाटते, ती व्यक्ति कधीच आत्महत्या करू शकत नाही.’
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajputs ex-driver revealed why actor could not commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.