या दोन आजारांनी ग्रस्त होता सुशांत, हिंदुजामध्ये आठवडाभर होता भरती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 04:41 PM2020-07-12T16:41:48+5:302020-07-12T16:45:11+5:30

एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने  केला  नवा खुलासा

sushant singh rajput was admitted at hinduja hospital for a week he was suffering from paranoia and bipolar disorder |  या दोन आजारांनी ग्रस्त होता सुशांत, हिंदुजामध्ये आठवडाभर होता भरती!!

 या दोन आजारांनी ग्रस्त होता सुशांत, हिंदुजामध्ये आठवडाभर होता भरती!!

googlenewsNext
ठळक मुद्दे तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुशांतची आई सुद्धा डिप्रेशनची शिकार होती.

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर आता एक नवीन माहिती समोर येतेय. वांद्रे पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी आत्तापर्यंत सुमारे 3 डझनभर लोकांची चौकशी केलीय. आता एका वरिष्ठ पोलिस अधिकाºयाने नवा खुलासा केला आहे.
एनबीटीने याबाबतचे वृत्त दिले आहे. या अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप याप्रकरणी कुठल्याही प्रकारच्या कट कारस्थानाचे पुरावे नाहीत. हे प्रकरण पूर्णपणे आत्महत्येचे आहे. सुशांतने आत्महत्या का केली, या प्रश्नाचे उत्तरही पोलिसांना जवळ जवळ मिळाले आहे. 

 

या अधिका-याने सांगितले की, सुशांत paranoiaआणि bipolar डिसऑर्डरने ग्रस्त होता. लॉकडाऊनआधी या आजाराच्या उपचारासाठी तो एक आठवडा हिंदूजा रूग्णालयात भरती होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुशांतची आई सुद्धा डिप्रेशनची शिकार होती. त्यांच्यावरही दीर्घकाळ उपचार केले गेले होते. सुशांत 16 वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. सुशांतला चार बहिणी होती. पण त्या सर्वांचे लग्न झाले होते. वडील बिहारमध्ये राहत होते. सुशांत एकटा मुंबईत राहायचा आणि बॉलिवूडमध्ये बिझी असूनही त्याला एकाकीपण जाणवायचे. सुशांतला आर्थिक समस्या अजिबात नव्हती.

या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, paranoiaच्या रूग्णाला संशयाचा आजार असतो. प्रत्येकजण आपला द्वेष करतो, असे रूग्णास सतत वाटते. आपला मर्डर होईल, अशा भावनाही त्याच्या मनात येत राहतात. bipolarच्या रूग्णामध्ये मूड स्विंग आढळतो. अचानक तणाव आणि अचानक आत्मविश्वाय, अचानक नैराश्य अशी हा आजार असलेल्या लोकांची मनोवस्था असते. इच्छा असूनही असे लोक स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
सुशांत गेल्या 14 जूनला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येच्या दु:खातून अद्यापही चाहते सावरलेले नाहीत.

Web Title: sushant singh rajput was admitted at hinduja hospital for a week he was suffering from paranoia and bipolar disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.