ठळक मुद्देरियापूर्वी सुशांत अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचे रिलेशनशिप अगदी लग्नापर्यंत पोहोचले होते.

बी-टाऊनमध्ये सध्या सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या लव-अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. खरे तर हे नाते पब्लिक होऊ नये, यासाठी सुशांत व रियाने बरेच प्रयत्न केलेत. पण शेवटी लोकांना कळू नये ते कळलेच. आता एक ताजी खबर आहे. होय, सुशांत म्हणे लग्नासाठी भलताच उतावीळ झाला आहे. रियासोबत लवकरात लवकर लग्न करून संसार थाटण्याची त्याची इच्छा आहे. पण यात एक अडचण आहे. होय, सुशांत लग्नासाठी एका पायावर तयार असला तरी रिया मात्र या लग्नासाठी तयार नाही.

होय, रियाला आत्ताच लग्न करायचे नाही. इतका मोठा निर्णय घेण्याआधी एकमेकांना आणखी थोडे जाणून घेणे गरजेचे असल्याचे तिचे मत आहे. त्याचमुळे तिने सुशांतकडे थोडा वेळ मागून घेतला आहे. आता रिया सुशांतला किती वेळ वाट पाहायला लावते, ते बघूच.

अलीकडे एका मुलाखतीत सुशांतने रिया व त्याच्या रिलेशनशिपबद्दल बोलण्यास नकार दिला होता. ‘मी याबद्दल काहीही सांगणार नाही. मला याबद्दल बोलण्यास मनाई करण्यात आलीय, असे नाही. पण मी स्वत:च स्वत:ला याबद्दल बोलण्याची परवानगी दिलेली नाही. माझ्या मते, खुलासा करण्याची योग्य वेळ अद्याप आलेली नाही,’ असे तो म्हणाला होता.

रियापूर्वी सुशांत अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचे रिलेशनशिप अगदी लग्नापर्यंत पोहोचले होते. पण अनेक वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर सुशांत व क्रिती सॅननच्या रोमान्सच्या चर्चा रंगल्या. क्रितीमुळे सुशांत व अंकिताचे ब्रेकअप झाले, असेही म्हटले गेले. पण कालांतराने हे नातेही संपले. आता सुशांत रियाच्या प्रेमात वेडा झाला आहे. त्याचे हे नाते किती यशस्वी होते, ते पाहणे आता इंटरेस्टिंग असणार आहे.


Web Title: sushant singh rajput wants to merry rhea chakraborty but actress wants some time
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.