दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनला एक महिना पूर्ण होऊन गेला आहे. पोलीस याप्रकरणाची चहूबाजूने चौकशी करतायेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर रोज एक नवा प्रश्न उभा रहातो आहे. पोलिसांकडून सुशांतच्या प्रकरणाचा तपास जवळजवळ संपला आहे. आता फक्त व्हिसरा रिपोर्टची प्रतीक्षा केली जाते आहे. दरम्यान, आणखी दोन धक्कादायक खुलासे झाले आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी चौकशीदरम्यान बर्‍याच गोष्टी उघड केल्या होत्या पण आता एक महत्त्वाचे रहस्य समोर आले आहेl. सुशांतच्या आत्महत्येच्या घटनेजवळ लाल बॅगसुद्धा दिसली होती, ज्याचा खुलासा आता झाला आहे. 

सुशांतने ज्या रुममध्ये आत्महत्या केली होती त्यारुममधील लाल बॅग गेल्या अनेक दिवसांपासून चर्चाचा विषय बनली होती. याला कारणही तसेच होते सुशांतचा मित्र महेश शेट्टीजवळ देखील लाल बॅग दिसली होती. महेश एका फोटोत लाल बॅगेसोबत दिसला होता. ज्यानंतर महेश शेट्टीसुद्धा ट्रोल झाला होता. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार,  पोलिसांनी सत्य सांगितले आहे.मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या आत्महत्या केलेल्या ठिकाणी लाल रंगाची बॅग त्याची मोठी बहीण मीतूची होती. जेव्हा ती सुशांतला पाहण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर गेली तेव्हा ती तिच बॅग घेऊन आली.

याशिवाय संजय लीला भन्साळी यांनी सुशांतसिंग राजपूतला केवळ त्यांच्या चित्रपटासाठी ऑफर केले नव्हते, तर त्याची एक्सगर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही त्यांनी या चित्रपटातील खास गाण्याची ऑफर दिली होती. रिपोर्टनुसार भन्साळी यांनी स्वतः लावणी तयार केली होती पण अंकिताने ते करण्यास नकार दिला. यानंतर संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटातीलच लावणी काढून टाकली. भन्साळीने यापूर्वी पोलिस चौकशीत सांगितले होते की, त्यानी सुशांतला जवळपास 3 चित्रपट ऑफर केले होते, पण यश राजशी असलेल्या करारामुळे तो हे करू शकला नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant singh rajput suicide two secrets red bag ankita offer revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.