सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्याचा तपास सध्या वेगात मुंबई पोलिस करतायेत. सोमवारी दुसऱ्यांदा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. तब्बल 2 तास त्यांची चौकशी झाली. मीडिया रिपोर्टनुसार या चौकशी दरम्यान संजय लीला भन्साळी यांना 30 ते 35 प्रश्न विचारले गेले. संजय लीला भन्साळी म्हणाले चार वेळा त्यांनी सुशांतला अप्रोच केला होता.

भन्साळी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केले आहे की, त्यांनी 'रामलीला' आणि 'बाजीराव मस्तानी'साठी सुशांतशी संपर्क साधला होता. पण यशराज बॅनरच्या फिल्ममध्ये अडकल्यामुळे त्याच्याकडे ताराखा नव्हत्या. 'गोलियों की रासलीला- रामलीला'साठी सुशांतचे नाव फायनल झाले होते पण सुशांत दुसऱ्या प्रॉडक्शन हाऊससोबत करारमध्ये होते. 

असे म्हणतात की, सुशांतला खूप वाईट वाटले होते की या करारामुळे तो संजय लीला भन्साळीबरोबर काम करू शकला नाही.
अद्याप ३० जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले असून याप्रकरणी अनेकांना समन्स पाठविण्यात आले आहेत. मात्र, याबाबत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे किंवा वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निखिल कापसे यांच्याकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पुढची चौकशी दिग्दर्शक शेखर कपूर यांची होऊ शकते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant singh rajput suicide read sanjay leela bhansali full statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.