Sushant Singh Rajput Suicide Case: Now Subramanian Swamy Appoints Lawyer To Press CBI Enquiry | सुशांत आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीच्या शक्यतेत वाढ, सुब्रमण्यम स्वामींनी केली वकीलाची नियुक्ती

सुशांत आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीच्या शक्यतेत वाढ, सुब्रमण्यम स्वामींनी केली वकीलाची नियुक्ती

14 जूनला अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत 32 हून अधिक लोकांचा जबाबही नोंदवला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर सुशांतच्या निधनानंतर या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी जोर धरू लागली. माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीकरता सर्व आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी एका वकिलाची नियुक्ती केली आहे.

माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीकरता सर्व आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी एका वकिलाची नियुक्ती केली आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच ट्विटरवर दिली आहे.सुशांतच्या आत्महत्येनंतर सर्व स्तरातून या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होत होती. १४ जून रोजी सुशांत सिंहने वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ३० लोकांचे स्टेटमेंट घेतले. आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एका वकिलाची नियुक्ती या प्रकरणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांनी सीबीआय तपासणीसाठी उचललेल्या पावलांसाठी त्यांची ट्विटरवर खूप प्रशंसा होत आहे. लोक सुब्रमण्यम स्वामी यांचे आभार मानत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant Singh Rajput Suicide Case: Now Subramanian Swamy Appoints Lawyer To Press CBI Enquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.