सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत बहिणीने लिहिली इमोशनल पोस्ट, म्हणाली- तू जिथे असशील तिथे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 10:35 AM2020-07-15T10:35:40+5:302020-07-15T10:40:08+5:30

सुशांत सिंग राजपूतची बहीण र्किती सिंगने त्याच्या आठवणीत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

Sushant singh rajput sister shweta singh kirti shares emotional post after 1 month of actor demise | सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत बहिणीने लिहिली इमोशनल पोस्ट, म्हणाली- तू जिथे असशील तिथे...

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत बहिणीने लिहिली इमोशनल पोस्ट, म्हणाली- तू जिथे असशील तिथे...

Next

अभिनेता सुशांत सिंग राजपूचे निधन होऊन 14 जुलैला एक महिना झाला. सुशांत सिंग राजपूतची बहीण र्किती सिंगने त्याच्या आठवणीत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. श्वेता लिहिते, तुला जाऊन एक महिना झाला पण आम्हाला आजही तू आमच्यात असल्याचे जाणवते. लव्ह यू भाई, आशा आहे की तू जिथे कुठे असशील तिथं आनंदी असशील. काही दिवसांपूर्वी श्वेताने चाहत्यांचे आभार मानताना एक व्हिडिओ शेअर केला होता.

अनेकांनी सुशांतची आत्महत्या कटाचा भाग असल्याचा आरोप करत, याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीही लावून धरली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पोलिस वेगवेगळ्या मार्गाने तपास करत आहेत. आता पोलिस सलमान खान याचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. याप्रकरणी लवकरच त्याला समन्स जारी होऊ शकतो. अलीकडे पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमानची एक्स- मॅनेजर रेश्मा शेट्टी हिची चौकशी केली होती.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान आपल्या प्रॉडक्शन हाऊस सुशांत सिंह राजपूत याला घेऊन एका चित्रपटाची निर्मिती करणार होता. मात्र अचानक सलमान खानने सुशांतसोबत चित्रपट करण्यास नकार दिला. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आत्तापर्यंत त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती, त्याचा शेवटचा सिनेमा दिल बेचाराची अभिनेत्री संजना सांघी, यशराज फिल्म्स अशा एकूण तीन डझनभर लोकांची चौकशी करण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant singh rajput sister shweta singh kirti shares emotional post after 1 month of actor demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app