Sushant singh rajput sister shweta singh kirti reaction on arrests of rhea chakraborty brother showik chakraborty | शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअलच्या अटकेनंतर सुशांतची बहिणीने दिली 'ही' पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..

शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअलच्या अटकेनंतर सुशांतची बहिणीने दिली 'ही' पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघडकीस आल्यानंतर चौकशीदरम्यान एनसीबी सतत कारवाई करत आहे. शुक्रवारी रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर शुक्रवारी सायंकाळी एनसीबीने  रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली. यावर सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

श्वेताने पोस्ट शेअर करताना लिहिले, देवा तुझे आभार, आम्हा सर्वांना सत्याच्या दिशेने मार्ग दाखवत रहा. श्वेताची ही पोस्ट सध्या जोरदार व्हायर होते आहे. सुशांतचे फॅन्स यावर कमेंट करत आहेत. 

चौकशीत शोविकने रियासोबत ड्रगसंबंधी केलेले चॅट खरे असल्याचे कबुल केले आहे. यामुळे शोविकच रियासाठी मोठी अडचण ठरला आहे. या चॅटमध्ये रिया कोणत्यातरी व्यक्तीसाठी शोविककडे ड्रग्ज मागत आहे. यामुळे शोविकच्या म्हणन्यानुसार रियालाही अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

सुशांतच्या हत्येच्या आरोपाचा तपास आता वेगळ्याच दिशेने जात असून हत्या की आत्महत्या यावर सीबीआयला उत्तर शोधायचे आहे. सीबीआयनेच सुशांतची हत्या केल्याचे पुरावे सापडत नसल्याचे म्हटले होते. यामुळे सीबीआय आता आत्महत्या केली असण्याच्या शक्यतेने तपास करत आहे. सुशांतच्या आत्महत्येमागे कोणती कारणे आहेत याचा शोधघेतला जात आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant singh rajput sister shweta singh kirti reaction on arrests of rhea chakraborty brother showik chakraborty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.