Sushant Singh Rajput lives with Bollywood actress in live in relationship, read details | सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत राहतोय लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये, वाचा सविस्तर

सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत राहतोय लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये, वाचा सविस्तर

सुशांत सिंग राजपूत व रिया चक्रवर्ती नेहमी स्वतःला सिंगल सांगतात. मात्र दोघंही रिलेशनशीपमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतात. तसेच दोघंही एकत्र बऱ्याचदा पब्लिक प्लेसवर दिसतात. तर कधी कधी लपून छपून सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठीदेखील जातात. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत त्याचं सगळं सामान घेऊन रियाच्या घरी गेला आहे.

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, सुशांत सिंग राजपूत त्याच्या बिल्डिंगमधून निघाला आणि रिया चक्रवर्तीसोबत तिच्या फ्लॅटमध्ये बॅग घेऊन गेला. असंही ऐकण्यात आलं होतं की सुशांतचे शेजारी सुशांतच्या घरात होणाऱ्या पार्टीमुळे त्रस्त होते.


सुशांतच्या बिल्डिंगच्या वॉचमेनने सांगितलं की सुशांतचे शेजारी नेहमी सुशांतच्या घरी होणाऱ्या पार्टीमुळे त्रस्त व्हायचे. त्याच्या पार्टीत मोठ्या आवाजात म्युझिक लावल्यामुळे खूप आवाज व्हायचा. कित्येक वेळा ड्युटीवर असणारा वॉचमेन सुशांतला पार्टीच्या वेळी बऱ्याचदा टोकले होते. तरीदेखील त्याला काहीच फरक पडत नव्हता. 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक आठवड्यापूर्वी सुशांत रियाच्या घरी शिफ्ट झाला आहे. जे वांद्रे येथे असून त्याच्या घरापासून जास्त दूर नाही. 
यापूर्वी सुशांत अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशीपमध्ये होता. सांगितलं जातं की त्याने कृति सेननलाही डेट केलं आहे. सुशांतचं नाव सारा अली खानसोबतही जोडलं गेलं होतं.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant Singh Rajput lives with Bollywood actress in live in relationship, read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.