अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री संजना सांघी आपला जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलीस स्टेशनला पोहोचली. संजनाचा एका व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती गाडीतून उतरताना वांद्रे पोलीस स्टेशनबाहेर दिसतेय. आतापर्यंत पोलिसांनी  27 लोकांचा जबाब  नोंदवण्यात आला आहे. सुशांतच्या कुटुंबीयांसह कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, कास्टिंग डारेक्टर मुकेश छाबडासह अनेक लोकांचा जबाब घेण्यात आले आहेत. 

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पोलीस 2007 पासून 2020पर्यंत सगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायेत. या वर्षांमध्ये सुशांतचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन कसे बदलले. अभिनेत्री संजना सांघी आणि सुशांतचा दिल बेचारा सिनेमा 24 जुलैला डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होणार जाणार आहे.

सुशांत मागच्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. कोणीतरी आपले करिअर संपवण्याच्या मागे आहे, असे त्याला वाटत होते. काही लोक आपली जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत, असेही त्याला वाटत होते. त्यामुळे आता संजनाच्या जबाबातून काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे.

नकारात्मक गोष्टींमुळे होता अस्वस्थ
 पोलिसांनी सुशांतच्या काही जवळच्या व्यक्तींची चौकशी केली होती. या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, सुशांत मागच्या काही काळापासून वृत्तपत्र, वेबसाइट आणि सोशल मीडियावर त्याच्याबाबत लिहिल्या जाणा-या नकारात्मक गोष्टींमुळे अस्वस्थ होता. त्याला सतत कोणीतरी आपले करिअर संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे भास होत असत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant singh rajput last film dil bechara co star sanjana sanghi called for interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.