ठळक मुद्दे गेल्या 8 वर्षांत म्हणजे 2012 ते 2020 या काळात रियाने एकूण 7 सिनेमे केलेत. पण यातला एकही सिनेमा हिट नव्हता.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सर्वाधिक चर्चेत आलेले नाव म्हणजे रिया चक्रवर्ती. आरोप झेलणारी आणि वेगवेगळ्या चौकशांना सामोरे जाणा-या रियाचा एक जुना व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय. रियाची स्वप्नं किती मोठी होती, याची कल्पना या व्हिडीओवरून यावी.
रियाला आयुष्यात काय काय खरेदी करायचे होते, याचा प्लान तयार होता. या व्हिडीओत ती याच प्लानबद्दल बोलतेय.  एक खासगी बेट , प्रायव्हेट जेट आणि हॉटेल अशा अनेक गोष्टी खरेदी करण्याचे लक्ष्य वा महत्त्वाकांक्षा तिने बाळगली होती.

व्हिडीओत ती म्हणते, मला हॉटेल खूप आवडते. त्यामुळे आयुष्यात स्वत:च्या मालकीचे हॉटेल असावे असे मला वाटते. मला हॉटेल खरेदी करायचे आहे.
रियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये बोटावर मोजण्याइतके सिनेमे केलेत. त्यातही सर्वच्या सर्व फ्लॉप. तरीही तिच्याकडे कोट्यावधी रूपयांची संपत्ती आहे.   रियाचे वडील आर्मीत डॉक्टर आहेत आणि आई गृहिणी. तिला एक भाऊ असून त्याचे नाव शेविक आहे. या चौघांवरही सुशांतप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणुकीचा आरोप आहे.  

 2009 मध्ये एमटीव्हीच्या ‘टीन दीवा’ या रिअ‍ॅलिटी शेमध्ये ती फर्स्ट रनर अप होती. यानंतर तिने दिल्लीत एमटीव्हीच्या व्हिडीओ जॉकी बनण्यासाठी आॅडिशन दिले आणि पाठोपाठ सिलेक्टही झाली.  व्हीजे म्हणून तिने कॉलेज बीट, टिकटॅक सारखे प्रोग्राम होस्ट केलेत. टीव्ही प्रोग्राम होस्ट केल्यानंतर रियाला अ‍ॅक्टिंग करिअर खुणावू लागले.  

व्हीजे असताना रिया इंजिनिअरिंग करत होती. मात्र अ‍ॅक्टिंग करिअरसाठी तिने इंजिनिअरिंग सोडले. 2012 मध्ये तिला पहिला ब्रेक 2012 मिळाला. तिने तेलगू फिल्म ‘तुनीगा तुनीगा’तून पदार्पण केले. मात्र चित्रपट प्लॉप झाला. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.   गेल्या 8 वर्षांत म्हणजे 2012 ते 2020 या काळात रियाने एकूण 7 सिनेमे केलेत. पण यातला एकही सिनेमा हिट नव्हता. मात्र गेल्या दोन वर्षांचे रियाचे इन्कम टॅक्स रिटर्न बघितले असता तिचे वार्षिक उत्पन्न 10 ते 14 लाखांच्या आसपास आहे.  तिच्या जवळ मुंबईमध्ये कोट्यावधींची संपत्ती आहे.  मुंबईत तिचे दोन फ्लॅट आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajput girlfriend rhea chakraborty wanted to buy private jet hotel and much more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.