sushant singh rajput friend ganesh hiwarkar and ex-staff ankit acharya are on a hunger strike in delhi from oct 2 | जस्टिस फॉर सुशांत! उपोषणावर बसणार गणेश व अंकित

जस्टिस फॉर सुशांत! उपोषणावर बसणार गणेश व अंकित

ठळक मुद्देगणेश व अंकितने सुरक्षा पुरवण्याची मागणीही केली आहे. मीडियासमोर आल्यानंतर दोघांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर दोघांनी सुरक्षेची मागणी केली आहे.

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला आता तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. अशात सुशांतसाठी न्यायाची मागणी करणारे त्याचे तमाम चाहते, मित्र, कुटुंबीय अस्वस्थ होऊ लागले आहेत. अशात सुशांतचा मित्र व कोरिओग्राफर गणेश हिवारकर आणि सुशांतचा स्टाफ अंकित आचार्य या दोघांनी आता उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला आहे.
सुशांत प्रकरणात सीबीआय तपासाला होत असलेला विलंब बघता, या तपासाला आणखी गती प्राप्त व्हावी, अशी गणेश व अंकित यांची मागणी आहे. याच मागणीसाठी दोघे उद्या गांधी जयंतीच्या मुहूर्तावर उपोषणावर बसणार आहेत. खुद्द गणेशने सोशल मीडियावर याची माहिती दिली.
 ‘मी दिल्लीत पोहोचलो आहे. सुशांतचे चाहते आणखी प्रतीक्षा करू 
शकत नाहीत. 2ऑक्टोबरला उपोषण करणार आहोत. मित्रांनो आपण दिल्ली हादरवून सोडू. कृपया ऊर्जाशील राहा. आपल्याकडे एकच अजेंडा आहे, तो म्हणजे जस्टिस फॉर सुशांत,’ असे त्याने लिहिले.

आम्हाला या आंदोलनासाठी गांधीजींचा आशिर्वाद हवा आहे. त्यामुळे आम्ही इंदिरा गांधी विमानतळावरुन राजघाट पर्यंत पदयात्रा करणार आहोत. तुम्ही देखील या उपोषणात सहभागी व्हा, अशी एक आणखी पोस्ट त्याने लिहिली आहे. गणेश आणि अंकित यांनी सुशांतच्या चाहत्यांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान दिल्ली विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतले. सुरक्षा कारणास्तव पोलिसांनी मला ताब्यात घेतले होते. मात्र जुजबी चौकशीनंतर त्यांनी सुटका केली, असे गणेशने सांगितले.

केली सुरक्षेची मागणी
गणेश व अंकितने सुरक्षा पुरवण्याची मागणीही केली आहे. मीडियासमोर आल्यानंतर दोघांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर दोघांनी सुरक्षेची मागणी केली आहे.

सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला...! बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप 

बस्स झाला आता ! सुशांतच्या आत्म्याला तरी शांततेत राहू द्या, हितेन तेजवानी वैतगला

कुटुंबही अस्वस्थ
सुशांत सिंग राजपूतचे कुटुंबही तपासात होत असलेल्या विलंबामुळे अस्वस्थ आहे. काल सुशांतच्या वडिलांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. त्याआधी सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी सुशांतप्रकरणातील दिरंगाईमुळे त्याचे कुटुंब नाखूश असल्याचे म्हटले होते. तपासाची दिशा बदलली आहे. प्रकरण सुशांतच्या मृत्यूचे आहे आणि आता ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरु आहे. अशास्थितीत सुशांतचे कुटुंबीय हतबल झाले आहे, असे विकास सिंह म्हणाले होते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajput friend ganesh hiwarkar and ex-staff ankit acharya are on a hunger strike in delhi from oct 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.