सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत आज ग्लोबल प्रेयम मीट ठेवण्यात आली होती. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वजण या प्रेयर मीटचा भाग बनले. सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीने एक व्हिडीओ शेअर केला ज्यात कुटुंबातील सदस्यांनी सुशांतसाठी एक पूजा केली. व्हिडीओमध्ये सुशांतचे वडील बहीण श्वेतासोबत बसून जाप करताना दिसतायेत. सुशांतच्या वडिलांनाच हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, आगामी काळात, सीबीआय सुशांत सिंग राजपूतच्या खोलीत डमी चाचणी घेईल, जो रिक्रिएशनचा एक भाग असणार आहे. मृत्यूचे कारण समजण्यासाठी सीबीआय एक्सपर्टच्या मदतीने पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि विसरा रिपोर्ट समजून घेतील. तसचे विसराचा कोणतेही अतिरिक्त नमुना आहे की नाही हे देखील तपास होणार आणि गरज पडली तर सीबीआय पुन्हा एकदा याचा नमुना दुसऱ्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येईल. 


ईडीला सुशांतची कंपनीचे व्यवहार, बँक खाती आणि त्यावरील रक्कमेचे अनेक संदिग्ध व्यवहार आढळले आहेत. यावर रियाला विचारले असता तिने उत्तर देणे टाळले आहे. यामुळे सुशांतच्या वडिलांनी लावलेले आरोप खरे ठरू लागले आहेत. सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते असा दावा केला होता. आता ईडीच्या चौकशीमध्ये सर्व समोर येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant singh rajput father and sister perform puja for actor watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.