Sushant Singh Rajput fans troll Ankita Lokhande Latest Dancing Video WIth Her Beau Vicky Jain | बरं झालं सुशांतने तुझे हे रुप पाहिले नाही, व्हिडीओ पाहून सुशांतचे चाहते भडकले

बरं झालं सुशांतने तुझे हे रुप पाहिले नाही, व्हिडीओ पाहून सुशांतचे चाहते भडकले

अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. याच दरम्यान अंकिताचा एक व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ प्रियांका विकी जैनसह  थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तिची प्रशंसा करणे तर सोडाच चाहत्यांचा व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. ''बरं झालं तुझं हे रूप सुशांतने पाहिले नाही'' असे म्हणत तिच्यावर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिला काही जाणांनी ट्रोल देखील केलं आहे. सोशल मीडियावर अंकिताला पाहून सुशांतचे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

पहिल्यांदाच असे घडले आहे असे नाही यापूर्वीही वेगवेगळ्या कारणांवरून अंकिताला ट्रोल करण्यात आले आहे. नुकतेच दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो तिने शेअर केले होते. यावेळी चाहत्यांनी अशाच प्रकारे आपला राग व्यक्त केला होता. इतक्यात सुशांतला विसरली का? असा सवाल सुशांतच्या एका नाराज चाहत्याने केला. जस्टिस फॉर सुशांत सिंग राजपूतचे काय झाले?असा सवालही अनेकांनी तिला केला.

अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे.

सर्वांसमोर मागितली माफी

नुकतेच अंकिताने एक पोस्ट शेअर करत बॉयफ्रेंड विक्की जैनची खुल्लमखुल्ला सर्वांसमोर माफी मागितली होती. अंकिता लोखंडेने या पोस्टसोबत स्वत:चा आणि विक्की जैनचा फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये अंकिता लोखंडेने लिहिले की, तुझ्यासाठी माझ्या असलेल्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. जेव्हा मी आपल्या दोघांना एकत्र पाहते तेव्हा माझ्या डोक्यात सर्वात आधी एकच गोष्ट येते की माझ्या जीवनात एक मित्र, पार्टनर आणि सोलमेटसारखा व्यक्ती पाठवल्यामुळे मी देवाची आभारी आहे. माझ्या प्रत्येक अडचणीत साथ दिल्याबद्दल आभारी आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant Singh Rajput fans troll Ankita Lokhande Latest Dancing Video WIth Her Beau Vicky Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.