Mumbai Cruise Drug Case: ‘SRK’च्या पाठीशी ‘SSR’चे फॅन्स! सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांची ‘मन्नत’ बाहेर गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:58 PM2021-10-11T19:58:24+5:302021-10-11T19:59:27+5:30

Mumbai Cruise Drug Case, Aryan Khan Arrest : सुशांतच्या चाहत्यांनी का दिला शाहरूख व आर्यनला पाठींबा?

Sushant Singh Rajput Fans Gather Outside Mannat To Support Shahrukh Khan In Aryan Case On Behalf Of Late actor | Mumbai Cruise Drug Case: ‘SRK’च्या पाठीशी ‘SSR’चे फॅन्स! सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांची ‘मन्नत’ बाहेर गर्दी

Mumbai Cruise Drug Case: ‘SRK’च्या पाठीशी ‘SSR’चे फॅन्स! सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांची ‘मन्नत’ बाहेर गर्दी

Next
ठळक मुद्देगेल्यावर्षी सुशांत सिंग याच्या निधनानंतर शाहरूखने एक भावूक पोस्ट शेअर केली होती.

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या तुरुंगात आहे. 2 ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या एका अलिशान क्रूजवर छापेमारी करत एनसीबीने आर्यन खानला (Mumbai Cruise Drug Case) ताब्यात घेतलं आणि त्यानंतर अनेक तासांच्या चौकशीनंतर त्याला अटकही झाली. आर्यनला जामीन मिळेल, यासाठी शाहरूखने सगळे प्रयत्न केलेत. पण अद्याप आर्यनला जामीन मिळालेला नाही.

आर्यन खानला अटक झाल्यावर या प्रकरणाचे पडसाद उमटणे अपेक्षितच होते. सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत सर्वत्र या प्रकरणाचे पडसाद उमटले. याचदरम्यान बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आर्यन व शाहरूखच्या पाठीशी उभे दिसले. आता काय तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput ) याचे फॅन्सही शाहरूखच्या पाठीशी उभे दिसत आहेत.
काल रात्री ‘मन्नत’बाहेर सुशांतचे अनेक चाहते एकत्र आले आणि त्यांनी शाहरूख व आर्यनला पाठींबा जाहीर केला. या चाहत्यांच्या हातात पोस्टर्स होते. त्यावर सुशांतसोबत शाहरूख शिवाय दिशा सालियान यांचे फोटो झळकत होते.
सुशांत हा शाहरूख खान खूप मोठा फॅन होता. शाहरूखला तो आदर्श मानायचा. किंगखानला पाहूनच मी अभिनेता बनलो, तोच माझी प्रेरणा होता, असं सुशांत प्रत्येक मुलाखतीत सांगायचा. सुशांत आज जिवंत असता तर त्याने नक्कीच या प्रकरणात शाहरूखला पाठींबा दिला असता. हाच विचार करून सुशांतचे चाहते ‘मन्नत’ बाहेर जमले.
गेल्यावर्षी सुशांत सिंग याच्या निधनानंतर शाहरूखने एक भावूक पोस्ट शेअर केली होती. ‘तो माझ्यावर खूप प्रेम करत होता. मी त्याला खूप मिस करेल. त्याची एनर्जी, कामावरची त्याची निष्ठा, त्याच्या चेह-यावरचं हास्य... अल्ला त्याच्या आत्म्याला शांती देओ. हे खूपच दु:खद आहे,’ असे सुशांतसोबतचा एक फोटो शेअर करत शाहरखने लिहिले होते.
आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी सुशांतला पाठींबा दिला आहे. यात पूजा भट, सुनील शेट्टी, सलमान खान आदी कलाकारांचा समावेश आहे.

Web Title: Sushant Singh Rajput Fans Gather Outside Mannat To Support Shahrukh Khan In Aryan Case On Behalf Of Late actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app