sushant singh rajput family shares whatsapp chats with mumbai police | डिप्रेशनच्या बहाण्याने रियाने तीन महिने सुशांतला रिसॉर्टमध्ये ठेवले होते...! कुटुंबीयांनी शेअर केलेत स्क्रिनशॉट्स

डिप्रेशनच्या बहाण्याने रियाने तीन महिने सुशांतला रिसॉर्टमध्ये ठेवले होते...! कुटुंबीयांनी शेअर केलेत स्क्रिनशॉट्स

ठळक मुद्देकालपरवा सुशांतचे वडील केके सिंग यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता.  25 फेब्रुवारी रोजी मी सुशांत संकटात असल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले होते, असा दावा सुशांतच्या वडिलांनी या व्हिडीओमध्ये

सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणावरून राजकारण तापले असताना आता सुशांतच्या कुटुंबियांनी कथितरित्या काही व्हाट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. सुशांतचा जीव धोक्यात आहे, याची माहिती मुंबई आयपीएस ऑफिसर परमजीत सिंग दहिया यांना देण्यात आली होती, असे कथितरित्या या मॅसेजमधून उघड होत आहे.
कालपरवा सुशांतचे वडील केके सिंग यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता.  25 फेब्रुवारी रोजी मी सुशांत संकटात असल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि माझ्या मुलाचा जीव गेला, असा दावा सुशांतच्या वडिलांनी या व्हिडीओमध्ये केला होता. मुंबई पोलिसांनी मात्र आमच्याकडे अशी कुठलीही लेखी तक्रार आली नसल्याचा प्रतिदावा केला होता. याच पार्श्वभूमीवर सुशांतच्या कुटुंबाने व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. यात सुशांतचे भावोजी ओ. पी. सिंग  आणि मुंबई आयपीएस ऑफिसर परमजीत सिंग दहिया यांच्यात सुशांतबद्दल चर्चा झाल्याचे स्पष्ट दिसतेय. 

मॅसेजमध्ये काय आहे?
या व्हाट्सअ‍ॅप चॅटमध्ये सुशांतचे नाव लपवण्यात आले आहे. मात्र हे सर्व मॅसेज मुंबई आयपीएस ऑफिसर परमजीत सिंग दहिया यांना पाठवण्यात आले होते.
 ‘तो घरी सगळ्यांचा लाडका आहे. माझी पत्नी त्याच्याबद्दल चिंतीत अहे,’ असे ओ. पी. सिंग यांनी दहिया यांना पाठवलेल्या पहिल्या मॅसेजमध्ये म्हटले आहे. एका अन्य मॅसेजमध्ये लिहिलेले आहे की, ‘रिया काही दिवसांपूर्वी सुशांतच्या घरी राहायला पोहोचली. त्याच्या डिप्रेशनवर उपचार करण्याच्या बहाण्याने ती व तिचे कुटुंब त्याला विमानतळाजवळच्या एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेले आणि तीन महिन्यांपर्यंत त्याला तिथेच ठेवले. तेव्हापासून तेच त्याचे काम सांभाळत आहेत.’
एका अन्य मॅसेजमध्ये लिहिलेय, ‘त्याचा क्लासमेट बुद्धा त्याच्यासोबत आहे. तो तुम्हाला सापडेल. त्याने स्वत:ला इजा पोहोचवू नये, असे वाटते.’ 
पुढच्या मॅसेजमध्ये लिहिलेय की, ‘रियाने त्याच्या टीममधील सर्व प्रामाणिक लोकांना काढून टाकले असून स्वत:च्या मर्जीतील लोकांना कामावर ठेवले आहे. त्याची तिसरी बहीण दिल्लीत एक वकील आहे आणि ती अनेकदा त्याच्यासोबत राहायला जायची. ती सुद्धा घाबरलेली आहे. कारण त्याच्याजवळ असे लोक आहेत, ज्यांनी त्याला पूर्णपणे नियंत्रणात ठेवले आहे. त्याने त्यांच्यासमोर जणू शरणागती पत्करली आहे. त्याचा जीव धोक्यात आहे.’

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajput family shares whatsapp chats with mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.