ठळक मुद्देसचिन हा इन्स्टाग्रामवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर त्याचे 10 हजारांवर फॉलोअर्स आहेत.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचा धक्का अद्यापही त्याचे चाहते पचवू शकलेले नाहीत. अनेक प्रश्न मागे ठेवून सुशांत या जगातून गेला पण त्याच्या आठवणींनी चाहते भावूक झाले आहेत. सोशल मीडियावर सुशांतचे अनेक जुने व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. याचदरम्यान सुशांतसारख्या हुबेहुब दिसणा-या एका तरूणाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या तरूणाचे नाव आहे सचिन तिवारी.

सचिन बराचसा सुशांतसारखा दिसतो. त्याचा लूक, त्याची स्टाईल सेम टू सेम सुशांतसारखी आहे. सुशांत या जगात नाही. पण सुशांतसारखा दिसणा-या सचिनला पाहून चाहते सुखावले आहेत. चाहत्यांनी सचिनचे फोटो, व्हिडीओ शेअर करण्याचा धडाका लावला आहे.

त्याचे व्हिडीओ पाहून अनेक लोक कमेंट करत आहेत. काहींनी तर त्याला सुशांतच्या वडिलांना भेटण्याचा सल्लाही दिला आहे. बॉलिवूड कलाकारांचा डुप्लिकेट सापडण्याची अर्थात ही पहिली वेळ नाही. याआधीही ऐश्वर्या राय, सलमान खान, शाहरूख खान, अनुष्का शर्मा अशा अनेकांसारखे सेम टू सेम दिसणाºया व्यक्तिंचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते.

सचिन हा इन्स्टाग्रामवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर त्याचे 10 हजारांवर फॉलोअर्स आहेत. आता त्याचे फॉलोअर्स आणखी वाढणार, हे नक्की.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajput doppelganger sachin tiwari shares striking similarities video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.