sushant singh rajput death rhea chakraborty and her family leave their mumbai apartment amid the investigation | सुशांत सिंग प्रकरण : रिया चक्रवर्तीने कुटुंबासोबत अर्ध्यारात्री गुपचूप सोडली मुंबई?  

सुशांत सिंग प्रकरण : रिया चक्रवर्तीने कुटुंबासोबत अर्ध्यारात्री गुपचूप सोडली मुंबई?  

ठळक मुद्देसुशांत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्वप्रथम रियाला चौकशीसाठी बोलावले होते. रिया या चौकशीला हजर होती. मात्र  सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांत रियाविरोधात तक्रार दाखल करताच रिया मुंबईतून गायब झाली.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती सध्या कुठे आहे? हे कोणालाही ठाऊक नाही. सुशांतच्या वडिलांनी पाटणाच्या राजीव नगर ठाण्यात रिया व तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केली आणि त्यानंतर रिया अचानक गायब झाली. 3-4 दिवसांपूर्वीच रियाने कुटुंबीयांसोबत मुंबईतून पलायन केल्याचे मानले जात आहे.

रिपब्लिक वर्ल्डने दिलेल्या वृत्तानुसार, बिहार पोलिस सर्वप्रथम रियाच्या घरी चौकशीसाठी पोहोचले होते. मात्र रिया घरी सापडली नाही. 3-4 दिवसांपूर्वीच रिया मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईतील आपला फ्लॅट सोडून गेली. रियाच्या बिल्डिींगच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, रिया, तिचे वडील, आई आणि भाऊ असे सगळे मोठ-मोठ्या सुटकेस घेऊन फ्लॅट सोडून गेलेत. ते सर्व एका निळ्या रंगाच्या गाडीतून निघून गेले.
मॅनेजरने सुशांतबद्दलही माहिती दिली. सुशांत नेहमी रियाच्या घरी यायचा. मात्र अलीकडे काही दिवसांपासून त्याचे रियाच्या घरी येणेजाणे कमी झाले होते, असेही या मॅनेजरने सांगितले.

बिहार पोलिसांपासून का पळतेय रिया?
सुशांत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्वप्रथम रियाला चौकशीसाठी बोलावले होते. रिया या चौकशीला हजर होती. तिचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता. मात्र  सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांत रियाविरोधात तक्रार दाखल करताच रिया मुंबईतून गायब झाली. अलीकडे तिने तिचा एक व्हिडीओ जारी केला होता. ‘मला आपली न्यायव्यवस्था व देवावर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय जरूर मिळेल. सत्यमेव जयते,’ असे ती या व्हिडीओत म्हणाली होती. असे असताना बिहार पोलिसांसमोर यायला रिया का घाबरत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajput death rhea chakraborty and her family leave their mumbai apartment amid the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.