ठळक मुद्देसुशांत प्रकरणात रियाची अद्याप निर्दोष सुटका झालेली नाही.  एनसीबीने न्यायालयासमोर 30 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सुशांत सिंग राजपूतला डेट करत होती. त्याआधी फार कुणी तिला ओळखतही नव्हते. पण सुशांतच्या मृत्यूनंतर रिया अचानक कधी नव्हे इतकी चर्चेत आली. सुशांतच्या मृत्यूसाठी रियाला जबाबदार ठरवण्यात आले, पुढे ड्रग्ज प्रकरणात ती तुरुंगातही गेली. महिनाभर तुरुंगात राहिलेली रिया तूर्तास भूतकाळ विसरून आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतेय. पण याचदरम्यान आता रियाबद्दल आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. ही खुलासा करणारी कोण तर सुशांतची मैत्रिण स्मिता पारिख. (Smita Parikh) सुशांतआधी रिया बॉलिवूडच्या एका मोठ्या अभिनेत्याला डेट करत होती, असा दावा स्मिताने केला आहे. (Sushant Singh Rajput death case)
स्मिताने एक ट्विट केले असून सध्या तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘रिया आदित्य रॉय कपूरला (Aditya Roy Kapoor) डेट करत होती, अर्थात सुशांतला डेट करण्यापूर्वी. आदित्यने सोडल्यानंतर ती कशी सावरली, तर त्या अतृप्त आत्म्याच्या मदतीऩे. एक अतृप्त आत्मा तिला मदत करतो. एक महिला किती खालची पातळी गाठू शकते? तू स्वत: ही कहाणी कितींना ऐकवली ताई? एक धोकादायक व्यक्ती बिनबोभाट फिरत नाहीये ना? रियाला सुशांतच्या आयुष्यात पाठवण्यात आले होते,’ असे ट्विट स्मिताने केले आहे.


स्मिताच्या या पोस्टनंतर रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा सुशांतच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आली आहे. अनेक युजर्सनी स्मिताला तो अतृप्त आत्मा कोण? असा सवाल केला आहे. यावरही स्मिताने उत्तर दिले. तिने लिहिले, ‘ती नेहमी सांगायची, तिच्या लहानपणीचा मित्र 17 वर्षांचा असताना जग सोडून गेला. त्या मित्राचा आत्मा तिच्यासोबत आहे. किती दु:खद गोष्ट आहे.’

तुम्हाला माहित आहेच की, सुशांतच्या निधनानंतरच्या तपासात रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समध्ये आदित्य राय कपूरचे नावही समोर आले होते. रियाने आदित्यला 23 वेळा कॉल केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, रिया व आदित्यला 2012 ते 2014 याकाळात अनेकदा एकत्र पाहिले गेले होते. पण आता त्यांच्या अफेअरच्या दाव्यांनी सगळ्यांना हैराण केले आहे.
स्मिता पारिख ही सुशांतची खूप चांगली मैत्रिण होती, स्मिता ही एक दिग्दर्शक आहे. तिने आजवर काही प्रायोगिक नाटकांमध्येही काम केले आहे. एका शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने सुशांतसोबत तिची मैत्री झाली होती.     

सुशांत प्रकरणात रियाची अद्याप निर्दोष सुटका झालेली नाही.  एनसीबीने न्यायालयासमोर 30 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वत: हे आरोपपत्र सादर केले असून या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासोबतच आणखी 30 जणांनी नावे आहेत.  .

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajput close friend smita parikh says rhea chakraborty was dating Aditya Roy Kapoor before sushant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.