सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचे पती जॉईन करणार मुंबई क्राईम ब्रँच?... जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 06:07 PM2020-07-09T18:07:35+5:302020-07-09T18:36:48+5:30

सोशल मीडियावर सध्या एक बातमी व्हायरल होते आहे की सुशांतच्या बहिणीचा पती मुंबई क्राईम ब्राँचमध्ये सहभागी होणार आहेत.

Sushant singh rajput case brother in law of actor join mumbai crime branch investigation know truth | सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचे पती जॉईन करणार मुंबई क्राईम ब्रँच?... जाणून घ्या सत्य

सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचे पती जॉईन करणार मुंबई क्राईम ब्रँच?... जाणून घ्या सत्य

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास पोलीस करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी 30 लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. मात्र सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सोमवारी पोलिसांनी संजय लीला भन्साळी यांची दुसऱ्यांदा चौकशी केली. सोशल मीडियावर सध्या एक बातमी व्हायरल होते आहे की सुशांतच्या बहिणीचा पती ओपी सिंग मुंबई क्राईम ब्राँचमध्ये सहभागी होणार. सुशांतची मोठी बहीण रितूचे पती ओम प्रकाश शर्मा हरियाणा कॅडरचे आयपीएस ऑफिसर आहेत. वन इंडियाच्या रिपोर्टनुसार, ज्याने  सुशांतच्या मृत्यूमागे षडयंत्र असल्याचा दावा करत  याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीही केली होती.

सत्य काय आहे?
ओपी सिंह हरियाणा पोलिसात अतिरिक्त पोलिस अधिकारी आहेत आणि मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या विशेष ड्यूटी (ओएसडी) कार्यालयात तैनात आहेत. या व्हायरल पोस्टबद्दल सिंग यांनी मुंबई क्राईम ब्राँचमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताला त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनीही पुष्टी केलेली नाही. सुशांतच्या मृत्यूमुळे दु: खी असल्याचे सुशांतच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे आणि लोकांनी आपले नाव वापरुन अजेंडा चालवू नये असे आवाहन केले आहे.

 मुंबई पोलीस सुशांतच्या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सुशांतच्या बिल्डिंगची CCTV रेकॉर्डिंग ताब्यात घेतली आहे. आता पोलिस फॉरेंन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत.


 

Web Title: Sushant singh rajput case brother in law of actor join mumbai crime branch investigation know truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.