"मोहब्बत में नहीं फर्क जीने और मरने का.."अंकिता लोखंडेवर प्रचंड प्रेम करायचा सुशांत सिंग राजपूत, हा व्हिडीओ पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 03:23 PM2020-07-09T15:23:51+5:302020-07-09T15:27:09+5:30

सुशांतच्या निधनामुळे त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे अजूनही दु:खात आहे.

Sushant singh rajput on ankita lokhande says i just cannot do without her | "मोहब्बत में नहीं फर्क जीने और मरने का.."अंकिता लोखंडेवर प्रचंड प्रेम करायचा सुशांत सिंग राजपूत, हा व्हिडीओ पाहा

"मोहब्बत में नहीं फर्क जीने और मरने का.."अंकिता लोखंडेवर प्रचंड प्रेम करायचा सुशांत सिंग राजपूत, हा व्हिडीओ पाहा

Next

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याच्याशी संबंधीत अनेक व्हिडीओ समोर येतायेत. सुशांतच्या निधनाचा धक्का फक्त त्याच्या फॅन्सना किंवा कुटुंबीयांना बसला नाही आहे तर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला बसला आहे. सोशल मीडियावर त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो शेअर केला जातेय. सुशांतच्या निधनामुळे त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे अजूनही दु:खात आहे. सुशांतच्या निधनानंतर अंंकिता सोशल मीडियापासून लांब झाली आहे. याच दरम्यान, सुशांतचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो अंकिताबरोबरच्या त्याच्या नात्याबद्दल बोलताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये सुशांत अंकिता लोखंडेवर किती प्रेम करायचा याचा पुरावा आहे. अंकितासोबतच्या नात्याबाबत बोलताना सुशांतने शेअरीने सुरुवात केली, सुशांत म्हणतो,  ''मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का, उसी को देखकर जीते हैं जिस काफिर पर दम निकले.'' पुढे सुशांत म्हणतो, गेल्या सहा वर्षांत अंकिताने खूप धीर दिला आहे. खूप प्रेम करते आणि ती माझ्याबरोबर राहण्यासाठी एक्सायडेट असते. ती खूप सुंदर आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, मला तिच्यासोबत राहायचं आहे. 

सुशांत या व्हिडीओत पुढे म्हणतो, आपण कोणतंही नातं तोडण्यासाठी दररोज निमित्त बनवू शकता, परंतु जर आपणास नातं टिकवायचा असेल तर आपण त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, याच कारणामुळे मी बऱ्याचदा इमोशनल होतो, मला इनसिक्युएर रहायचे आहे, मला तिच्यासोबत राहायचे.'' यावरुन सुशांतचे अंकितावर किती प्रेम होते हे स्पष्ट होते. 

सुशांत आणि अंकिताची लव्हस्टोर पवित्रा रिश्ताच्या सेटवर सुरु झाली होती. सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर दोघांच्या नात्यामध्ये हळूहळू दुरावा याला लागला. ब्रेकअप नंतर अंकिता आतून तुटली होती. काहीकाळ तिने काम करणही बंद केले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant singh rajput on ankita lokhande says i just cannot do without her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app