ठळक मुद्देहोय, रैना सोनालीचा खूप मोठा फॅन आहे.

क्रिकेटपटू सुरेश रैना विवाहित आहे. एका मुलीचा बाप आहे. 3 एप्रिल 2015 रोजी सुरेश रैनाने त्याची बालपणीची मैत्रिण प्रियांका चौधरीची विवाह केला. दोघांना कन्यारत्नही झाले. सध्या रैना आपल्या संसारात आनंदी आहे. पण लग्नाआधी हाच रैना एका मराठमोळया अभिनेत्रीसाठी वेडा होता. तिच्यावर अनेक वर्षे त्याचा क्रश होता. नुकताच खुद्द रैनानेच हा खुलासा केला.


  ‘जिंग गेम ऑन ’ या शोमध्ये रैनाने कॉलेज लाईफमधील क्रशबद्दल सांगितले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. होय, कॉलेज लाईफमध्ये असताना एका अभिनेत्रीवर माझा क्रश होता. तिच्यासोबत डेटवर जाण्याचे स्वप्न मी बघायचो, असे त्याने सांगितले. आता ही अभिनेत्री कोण, तर सोनाली बेंद्रे.

होय, रैना सोनालीचा खूप मोठा फॅन आहे.   सोनालीला कॅन्सरचे निदान झाले तेव्हा रैनाने तिला मॅसेज पाठवत, ती लवकर बरी व्हावी यासाठीही प्रार्थना केली होती.


या शोमध्ये रैना त्याच्या मुलीबद्दलही बोलला. रैनाची मुलगी ग्रासिया ही चार वर्षांची आहे. तिच्याबद्दल तो म्हणाला, ‘माझी मुलगी माझा खूप मोठा सपोर्ट आहे. तिच्या येण्याने आम्हा सर्वांचे आयुष्य बदलले. ती माझी ट्रॅव्हल बडी आहे, जिम बडी आहे. तिच्यासोबत घालवायला खूप वेळ मिळत नाही. पण जितका वेळ मिळतो ते क्षण खास असतो.’
रैनाला गत आयपीएल मॅचदरम्यान गुडघ्याला जखम झाली होती. तेव्हापासून त्याने एकही सामना खेळलेला नाही. आॅगस्टमध्ये त्याच्या गुडघ्यावर सर्जरी झाली आणि आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. लवकरच तो आयपीएलमध्ये खेळणार आहे.

Read in English

Web Title: suresh raina reveals his lifelong crush on sonali bendre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.