बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोनीने अभिनय कौशल्यापेक्षा डान्समधील दिलखेचक अदांनी रसिकांनी चांगलीच भुरळ पाडलीय. सनीने रईस सिनेमात शाहरूख खानला लैला में लैला, शुटआऊट अॅट वडालामध्ये लैला, भूमि चित्रपटात ट्रीपि ट्रीपि आणि रागिनी एमएमएसमध्ये बेबी डॉल या गाण्यावर सर्वांना आपल्या तालावर थिरकताना दिसली. आता ती पुन्हा एकदा सर्वांना आपल्या तालावर थिरकवण्यासाठी सज्ज झालीय. आता ती दिलजीत दोसांझचा आगामी चित्रपट अर्जुन पटियालामध्ये आयटम साँग करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

अर्जुन पटियाला सिनेमात दिलजीतशिवाय अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय या सिनेमात अभिनेत्री सनी लियोनी आयटम साँग करताना दिसणार आहे.

ट्रेलरमध्ये सनीची एक झलकही पाहायला मिळतेय. ज्यामध्ये ती दिलजीत दोसांझसोबत डान्स करताना दिसून येतेय.

ट्रेलरमध्ये सनी लिओनी ही नियॉन ग्रीन कलरच्या टॉप आणि ब्लॅक कलरच्या शिमरी बॉटममध्ये दिसून येत आहे. सनीचा हा लूक तिला खूपच सूट होतोय. ज्यामध्ये ती बोल्ड आणि ब्यूटीफुल दिसते आहे. 


अर्जुन पटियाला चित्रपटात वरुण शर्माचं नाव ओनिडा असणार आहे तर क्रिती सेनॉनचं नाव रितु असणार आहे. जी पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

तर दिलजीत हा एका छोट्या शहरातून आलेला आणि पोलिसाच्या भूमिकेत दिसेल. हा सिनेमा एका छोट्या शहरातील असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा सिनेमा २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Web Title: Sunny Leony dancing with Diljit Dosanjh in Arjun Patiala Movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.