Sunny Leone's scary make up clip goes viral on social media | सनीला झाली का दुखापत... का होतोय हा व्हिडिओ व्हायरल?

सनीला झाली का दुखापत... का होतोय हा व्हिडिओ व्हायरल?

ठळक मुद्देहा व्हिडिओ पाहून सनीला काय झाले असा प्रश्न साहजिकच तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण सनीच्या चाहत्यांनी टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाहीये. कारण हा केवळ एक मेकअप असून मेकअपमनने तिच्या पाठीवर आर्टिफिशियल स्कीन लावली आहे.

ती आहे बोल्ड, ती आहे बिनधास्त... ती आहे इंटरनेटवरील मोस्ट सर्च्ड सेलिब्रिटी, नेटिझन्सना तिने अक्षरक्षः वेड लावलं आहे. बॉलिवूडची मस्तानी, देसी गर्लसुद्धा तिच्यापुढे फ्लॉप. ही ती म्हणजे पॉर्नस्टार आणि बोल्ड तसंच हॉट अभिनेत्री सनी लिओनी. इंडो-कॅनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पॉर्नस्टार आहे. सनीने 'जिस्म २’ चित्रपटातून' बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती.

सनी लियोनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत तिच्या पाठीवर आपल्याला भलीमोठी जख्म पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून सनीला काय झाले असा प्रश्न साहजिकच तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण सनीच्या चाहत्यांनी टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाहीये. कारण हा केवळ एक मेकअप असून मेकअपमनने तिच्या पाठीवर आर्टिफिशियल स्कीन लावली आहे. या व्हिडिओद्वारे प्राण्यांना त्रास न देण्याचा संदेश सनीने तिच्या चाहत्यांना दिला आहे. 

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे रोज नवे व्हिडीओ, फोटो ती शेअर करत असते. तिच्या सिनेमांची आणि प्रोजेक्टची जेवढी चर्चा होते तेवढीच तिच्या खासगी आयुष्याविषयी होते. याचमुळे गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सनीचे नाव आहे. सनीचा भूतकाळ, तिचे कुटुंब,तिचा प्रवास याबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. तिच्या आयुष्यावर एक वेबसिरिजदेखील बनवण्यात आली होती. 

Web Title: Sunny Leone's scary make up clip goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.