माजी पॉर्नस्टर आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. इंडो-कैनेडियन असलेल्या सनी लिओनीला प्रचंड लोकप्रियता असून तिचे चाहते जगभरात आहेत. सनी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते आणि बऱ्याचदा त्यामुळे ती चर्चेत येत असते. आता देखील ती इंस्टाग्रामवरील फोटोमुळे चर्चेत आली आहे. 


सनी लिओनी हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने व्हाइट रंगाच्या गाउनमधील फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करून तिने मॅरी मी असे लिहिले. या फोटोंमध्ये सनी लिओनी खूप ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोला काही तासात २ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 


सनीने 'जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले.


सनीने काही महिन्यांपूर्वी तिचा अगदी बालपणापासून ते बॉलिवूडपर्यंतचा जीवनप्रवास तिच्या वेब सीरिजच्या माध्यमातून लोकांसमोर आणला होता. सनीची वेबसीरिज 'करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' रिलीज झाल्यानंतर तिचं अवघं आयुष्य एका पुस्तकाप्रमाणे जगासमोर आलं. सनीच्या या वेबसिरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.


बेबी डॉल सनी लिओनी आज बॉलिवूडची एक मोठी स्टार आहे. पण आजही तिची पॉर्न स्टार ही ओळख पूर्णपणे पुसली गेलेली नाही. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सनी पॉर्न स्टार होती. पण पॉर्न स्टार बनण्यासाठीचा तिचा संघर्षही कमी नव्हता. एकेकाळी पैशांसाठी सनी पहाटे पेपर वाटायची. बेकरीमध्ये काम करायची. तिनेच या संघर्षाविषयी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sunny Leone wants to get married again, sharing photos and saying - 'Marry me ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.