सनी लिओनी सध्या स्प्लिटव्हिला शोचे शूटिंग करत आहेत. केरळमध्ये या शोच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे. शूटिंगमधून वेळ मिळताच मुलांना घेवून ती पती ड्रनिअल वेबरला भेटायला गेली. सनी लिओनीला पिकअप करण्यासाठी डॅनिअलही विमानतळावर पोहचला. मुलांपासून दूर असलेल्या डॅनिअलला मुलं आणि पत्नी सनीला पाहून भलताच आनंद झाला. मुलगी निशाने तर पापा डॅनिअल बघताच त्याला मिठी मारली. सध्या या कुटुंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सा-यांनीच पसंती दिली आहे.


दरम्यान यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायल झाला आहे. यात सनीने तोंडावरचा मास्क हटवत डॅनिअलला किस केले. हा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. सनीने 4 वर्षांपूर्वी 2017 मध्ये महाराष्ट्रातील लातूर येथून मुलगी निशाला दत्तक घेतले होते. त्यावेळी निशा फक्त 2 वर्षाची होती. त्यानंतर तिच्या २ जुळ्या मुलांचा जन्म झाला.


सनी लिओनी  बॉम्बे टाइम्ससोबत बोलताना म्हणाली की, 'मी कधीही विचार नव्हता केला की माझ्याकडे तीन मुलं असतील. मला वाटलं होतं की, हे हळूहळू होईल. मी विचार केला होता की, माझ्याकडे एक मूल असेल आणि नंतर दुसरं. पण असा अजिबात विचार नव्हता केला की, एकत्र तीन मुलं असतील'.

 

कामासोबत मुलं सांभाळणं जरा कठिण आहे. यात बराच वेळ टाइम मॅनेजमेंट करावं लागतं. आता जेव्हा मी माझ्या कामावर असते तेव्हा मुलांची आठवण येते. मी त्यांना सांगत असते की, मी काही कामासाठी बाहेर जात आहे. पण मी डीनरसाठी घरी येईन'.


'मला वाटतं कोरोना आल्यानंतर लोकांमध्ये आपल्या परिवारातील सदस्य दूर झाल्याने चिंता वाढली आहे. मलाही माझ्या मुलांपासून दूर गेल्यावर अशीच चिंता वाटत असते. पण ते अजून लहान आहेत.

 

आणि इतर गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष लावलं जाऊ शकतं. सनी आता तिचा जास्तीत जास्त वेळ मुंबईमध्ये घालवते. सनीला तीन मुलं आणि तिन्ही मुलांना सांभाळून ती तिच्या प्रोफेशलन कमिटमेंट पूर्ण करते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sunny Leone takes off her mask and kisses her husband in front Her Children On Airport, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.